Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई Ola-Uber Fare Hike: मुंबईत Ola-Uber प्रवास महागला; १५ टक्क्यांनी वाढले भाडे!

Ola-Uber Fare Hike: मुंबईत Ola-Uber प्रवास महागला; १५ टक्क्यांनी वाढले भाडे!

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना महामारीचं संकट असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे. या इंधनदरवाढीचा फटका आता सर्वत्र बघायला मिळतोय. मुंबईत कॅब अ‍ॅग्रीग्रेटर ओला आणि उबर यांनी त्यांच्या भाड्यात १५ टक्के वाढ जाहीर केली आहे. अ‍ॅप-आधारित दोन्ही अ‍ॅग्रीग्रेटर्स यांनी देशातील वेगवेगळ्या राज्यात भाडे वाढविले आहेत, जे तेथील इंधन दरानुसार निश्चित करण्यात आले आहेत.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, त्यांच्या ड्रायव्हर्सची मागणी भाडे वाढविणे होते, कारण इंधनाच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे असलेल्या भाड्यात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. चार मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत आज एक लिटर पेट्रोलची किंमत १०७.५४ रुपये प्रतिलिटर आहे तर डिझेल प्रतिलिटर रुपये उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजीच्या किंमती वाढवल्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

- Advertisement -

ओला आणि उबरच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, मे महिन्यातच वाहनचालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी सुरू केली असता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभर वेगाने वाढू लागल्या आहे. आम्ही इंधनाच्या वाढत्या किंमतींचा अभ्यास केला आणि भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला. परंतु, भाडेवाढ व नवीन भाडे रचना यावर भाष्य करण्यास दोन्ही कंपन्यांनी नकार दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी १ मार्च रोजी काळ्या आणि पिवळ्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या भाड्यात वाढ करण्यात आली. मुंबईत सीएनजी चालवणाऱ्या ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यात किमान ३ रुपयांची वाढ करण्यात आली. टॅक्सीमध्ये १.५ किमी अंतराचे किमान भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले, किमान १.५ कि.मी.चे अंतर हे नंतर प्रति किमी १६.९३ रुपये निश्चित करण्यात आले. तर ऑटो रिक्षांचे किमान भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये करण्यात आले तर प्रति किमी भाडे १४.२० रुपये करण्यात आले होते.

- Advertisement -