घरमुंबईआता छेडछाडीच्या जुन्या तक्रारीची उकल होणार!

आता छेडछाडीच्या जुन्या तक्रारीची उकल होणार!

Subscribe

पोलिसांकडे असलेल्या तक्रार अर्जानुसार संबंधित तक्रार संबंधित महिला किंवा मुलगी तिच्या कुटूंबियांना तसेच ज्याविरोधात तक्रार आहे त्याला तसेच त्याच्या कुटूंबियांना बोलावून शहानिशा करून विचारपूस केली जात आहे. पोलिसांनीच पुढाकार घेऊन तक्रारींची दखल घेतली जात असल्याने तक्रारदार मुली अथवा महिला आणि त्यांच्या कुटूंबियांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

मुली अथवा महिलांनी छेडछाडीसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली असेल, आणि त्या तक्रारीवर पोलिसांकडून कोणतीच कारवाई झालेली नसेल तर चिंता करण्याचे काहीच कारण नाही. कारण आता अशा सर्व तक्रारींची पोलिसांकडून उकल केली जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील ३७ पोलीस ठाण्यांना तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता छेडछाडीच्या जुन्या तक्रारींची उकल करण्याच्या कामाला पोलीस लागले आहेत. पोलीस आयुक्तांच्या नव्या आदेशामुळे मुली आणि महिलांना दिलासा मिळाला आहे.

एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या २० वर्षीय तरुणीची आकाश पवार नावाच्या तरुणाने भरदिवसा निर्घृणपणे हत्या केली होती. प्राचीच्या हत्येनंतर तिच्या कुटूंबियांनी दीड महिन्यांपूर्वीच आकाशच्या छेडछाडीविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा मुद्दा समोर आला होता. मात्र पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नसल्यानेच प्राचीचा जीव गेल्याचा आरोप प्राचीचे वडील विकास झाडे यांनी केला होता. तर पोलिसांनीही झाडे कुटूंबियांच्या तक्रार अर्जानुसार प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे सांगितले होते. मुली, महिलांच्या छेडछाडीप्रकरणाची खुद्द नव्या पोलीस आयुक्तांनीच आता दखल घेतली आहे. कोणत्याही मुली अथवा महिलेने छेडछाडीसंदर्भात यापूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असेल तर त्या तक्रारींवर काय कारवाई झाली, त्या मुली अथवा महिलेचा त्रास कमी झाला की सुरूच आहे. याची पुन्हा उकल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात हे काम सुरू झाले आहे. पोलिसांकडे असलेल्या तक्रार अर्जानुसार संबंधित तक्रार संबंधित महिला किंवा मुलगी तिच्या कुटूंबियांना तसेच ज्याविरोधात तक्रार आहे त्याला तसेच त्याच्या कुटूंबियांना बोलावून शहानिशा करून विचारपूस केली जात आहे. पोलिसांनीच पुढाकार घेऊन तक्रारींची दखल घेतली जात असल्याने तक्रारदार मुली अथवा महिला आणि त्यांच्या कुटूंबियांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

मुली, महिलांच्या अत्याचारात वाढ

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे असे पाच परिमंडळ येतात. गेल्या सहा महिन्यात ३०८ बलात्काराचे तर ८३९ विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. चोरी, घरफोडी आणि सोनसाखळीच्या घटना नित्याच्याच असतानाच मुली आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तसेच हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणार्‍या छळाच्या तक्रारीही वाढल्या आहेत. ठाणे ग्रामीण परिसरात गेल्या सहा महिन्यात बलात्काराच्या ६३ केसेस तर विनयभंगाच्या १७६ केसेस दाखल झाल्या आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे केले जात असले, तरीही समाजात असे प्रकार वाढत असल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

मुली आणि महिलांनी यापूर्वी दिलेल्या तक्रारींचा तपास करण्यासंदर्भात सर्वच पोलीस ठाण्यांना आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात कामही सुरू झाले आहे. त्यामुळे तक्रारदार मुली आणि महिलांच्या मनात पोलिसांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. महिला सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित राहिल. महिला आणि मुलींच्या सुरक्षेविषयी पोलीस नेहमीच जागरूक आणि संवेदनशील आहेत.
-विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त ठाणे

( बलात्कार ) :- जानेवारी ते जून २०१८

महिना                दाखल             डिटेक्ट
जानेवारी              २०                  १७
फेब्रुवारी               ४२                 ३७
मार्च                   ६४                 ५५
एप्रिल                  ९०                 ७८
मे                       ९२                 ८३

 

(विनयभंग) :- जानेवारी ते जून २०१८

महिला               दाखल              डिटेक्ट
जानेवारी               ४४                  ३४
फेब्रुवारी               ८३                  ७१
मार्च                   १२८                 ११९
एप्रिल                  १६७                १४८
मे                      १८४                १५२
जून                    २३३                १८९

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -