घरताज्या घडामोडीबेस्टमध्ये जेष्ठ नागरिकांचे न्यू नॉर्मल; सर्रास प्रवासाला सुरूवात

बेस्टमध्ये जेष्ठ नागरिकांचे न्यू नॉर्मल; सर्रास प्रवासाला सुरूवात

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृद्ध प्रवाशांनसह पाच वर्षांखाली मुलांना घराबाहेर पडण्यास आणि प्रवास करण्यास शासनाने मनाई केली आहे. मात्र, असे असताना देखील सुद्धा, बेस्ट आणि एसटी बसेसमध्ये आज सर्रास वृद्ध प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृद्ध प्रवाशांनसह पाच वर्षांखाली मुलांना घराबाहेर पडण्यास आणि प्रवास करण्यास शासनाने मनाई केली आहे. मात्र, असे असताना देखील सुद्धा, बेस्ट आणि एसटी बसेसमध्ये आज सर्रास वृद्ध प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यांना बसखाली उतरविल्यास वाहकाबरोबर हुज्जत घालून चक्क भाडणे करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची डोके दुःखी वाढली आहे. मात्र, यावर बेस्ट प्रशासनाकडून कसलीही उपाययोजना करण्यात येत नाही आहे. त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांबरोबर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्तापाला समोर जावे लागत आहे.

गेल्या अडीच महिन्यांनंतर मुंबईत ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत पुन्हा बेस्ट, एसटीच्या बस सुरू झाल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, मंत्रालय अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती केली आहे. तर, खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी देखील देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी बेस्टने २ हजार ५०० बसेस आणि एसटीने मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून १ हजार २०० बसचे नियोजन केले आहे. मात्र, या सगळ्या नियोजनाचे पहिल्याच दिवशीपासून तीन तेरा वाजले आहेत.

- Advertisement -

मुंबई आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये धावणाऱ्या बसेसमध्ये फिजिकल डिस्टंसिंग नियमचा फज्जा उडताना दिसून येत आहे. तसेच शासनाने दिलेल्या दिशा निर्देशाचे सुद्धा पालन बेस्ट आणि एसटी महामंडळाकडून केला जात नाही. कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्ध प्रवाशांना आणि पाच वर्षाांखाली मुलांना असल्यामुळे शासनाकडून वृद्धांना आणि मुलांना प्रवास करण्यास मनाई केली आहे. तरी सुद्धा बेस्टच्या बसेसमध्ये सर्वाधिक वृद्ध प्रवासी प्रवास करत आहेत. सहप्रवाशांनी ही गोष्ट बेस्टचा वाहकांना लक्षात आणू दिली, तरी त्यांना खाली उतरविण्यात येत नाही.आता तर बेस्ट उपक्रमातर्फे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बस फेऱ्या शुक्रवारपासून खंडित करण्यात आलेल्या आहे. कारण लाेकलची वाहतूक सुरु झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी ज्यांना लाेकलमध्ये प्रवास मुभा नाही. त्या कर्मचाऱ्यांची कुंचबणा हाेत आहे. उपक्रमाने अत्यावश्यक सेवेसाठी सुरू केलेले अतिरिक्त मार्ग बंद केल्याने इतर प्रवाशांसाठी बसच्या अधिक फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे बसप्रवाशांची आणि वृद्ध प्रवाशांची संख्या वाढली आहे. यासंबंधित दैनिक ‘आपलं महानगर’ने बेस्टचा जनसंपर्क विभागाला माहिती विचारल्यास माहिती घेऊन सांगतो, असे सांगण्यात आलेले आहे.

वाहक आणि प्रवाशांत होतोय भांडण

आम्ही अनेकदा प्रवाशांना फिजिकल डिस्टसिंगचे पालन करण्याचे आवाहन करतो. मात्र, प्रवासी काही ऐकत नाही. आता तर वृद्ध प्रवाशांना बसेसमध्ये प्रवेश दिला नाही. तर आमच्याशी हुज्जत घालून भाडणे करतात. इतकेच नव्हेतर आमची तक्रार करण्याची धमकी आम्हाला देतात. तसेच एका बसमध्ये फक्त २८ प्रवाशांना घेण्याची परवागी आहे. ज्यात २३ बसून तर पाच प्रवासी उभे आम्ही घेऊन जाऊ शकतो. मात्र, प्रवासी बळजबरी बसेसमध्ये प्रवेश घेतात. त्यानंतर बस मधून खाली उतरवल्यास आमच्याशी भाडणे करता. यासंबंधित बेस्ट प्र शासनाकडे आम्ही तक्रारी केल्या तरीही आमचा या तक्रारीवर बेस्टकडून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आमची डोके दुखी वाढली आहे अशी प्रतिक्रिया दैनिक आपलं महानगरशी बोलतां एक बेस्ट वाहकाने दिली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बेस्टचा बसेस प्रवाशांसाठी सुरू झाल्या आहे. मात्र, बेस्टकडून कसलंही नियोजन केले नाही. आज शासना दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करत असताना बेस्टचा कर्मचाऱ्यांना अडचीण निर्माण होत आहेत. वृद्ध प्रवाशांनी सर्रास बेस्टचा बस मधून प्रवासाला सुरूवात केली आहे. त्यामुळे बेस्टचा वाहकांबरोबर प्रवाशांची डोके दुखी वाढली आहे. – जगनारायण कहार,सरचिटणीस, बेस्ट कामगार संघटना


हेही वाचा – अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती


Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -