omicron vaccine : दादर चैत्यभूमी परिसरात हजारोंच्यावर लसीकरण; सुरेश काकाणींची माहिती

omicron vaccine 1 thousand vaccination completed in dadar babasaheb ambedkar mahaparinirvan din says Suresh Kakani
omicron vaccine : दादर चैत्यभूमी परिसरात हजारोंच्यावर लसीकरण, सुरेश काकाणींची माहिती

देशात वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात आता मुंबई महानगरपालिका देखील सज्ज झाली आहे. मुंबईत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संशयित रुग्णांची संख्या २४ वर पोहोचली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे वाढते संकट पाहता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई महापालिकेकडून चैत्यभूमी परिसरात अनुयायांसाठी विशेष आरोग्य सुविधा, कोरोना चाचणी आणि लसीकरणाची सुविधा सुरु केली आहे. यात लसीकरण सुविधेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास हजारोंच्यावर नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

सुरेश काकाणी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी परिसरात दाखल झाले होते. यावेळी बोलताना काकाणी म्हणाले की, “दरवर्षी मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी परिसरात येत असतात. यावेळी विविध स्थानकावर उतरणाऱ्या अनुयायांसाठी ठराविक ठिकाणी हेल्थ चेकअप कॅम्प लावले आहेत. हेल्थ चेकअप, आरटीपीसीआर आणि लसीकरण कॅम्प सुरु केले आहेत. यातून लस न घेतलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल. याचा लाभ बरीच लोक घेत आहेत. कालपासून हजारोंच्यावर अनुयायांनी लस घेतली आहे. आजही गर्दी लक्षात घेता चार ते पाच ठिकाणी लसीकरण कॅम्प सुरु करत आहोत.”

“मुंबईत ३० हजार बेड्स उपलब्ध आहेत”

“यात मुंबई महानगरपालिका दोन प्रकारची खबरदारी घेत आहे. एक म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेस्टिंग सुरु आहे. यातून पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णास तातडीने अॅडमिट केले जातेय. तसेच निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तीला घरी पाठवले जातेय मात्र निगेटिव्ह व्यक्तीला सात दिवस क्वारंटाईन होणे सक्तीचे आहे. मुंबईतील सर्व रुग्णालयांतील मिळूण एकूण ३० हजार बेड्स तयार आहेत. यातील १५ हजार बेड ऍक्टिव्ह आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये औषध, डॉक्टर आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ७० हजार बेड सीसी 1 सीसी 2 चे आहेत. तर लहान मुलांसाठी १५ हजार बेड्स उपलब्ध आहेत.” असही काकाणी म्हणाले.

“मुंबईत आज १९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ६ संशयित रुग्णांना ट्रेस करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांचे रिपोर्ट जिनोम सिक्वेन्सी करण्यासाठी पाठवले आहेत. ओमयक्रॉनच्या पार्श्वभूमीवर WHO ने केलेल्या सूचनेनुसार, १५ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढच्या आठवड्यात शाळांबाबत निर्णय घेऊ” असेही काकाणी यांनी सांगितले.


Mahaparinirvan Din: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन; अनुयायांसाठी विशेष सुविधा, काय आहे नियमावली?