घरमुंबईगरोदर महिलेच्या मदतीसाठी रिक्षा थेट प्लॅटफॉर्मवर

गरोदर महिलेच्या मदतीसाठी रिक्षा थेट प्लॅटफॉर्मवर

Subscribe

 रविवारी झालेल्या अतिवृष्टीत रेल्वे डब्यात अडकलेल्या गरोदर महिलेच्या मदतीसाठी रिक्षा थेट प्लॅटफॉर्मवर धावताना दिसली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करून कारवाई केली.
विरारमधील एक गरोदर महिला रविवारी प्रसुतीसाठी मुंबईकडे निघाली होती. विरार ते वसई दरम्यान रुळावर पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे ही महिला विरार रेल्वे स्टेशनवर असलेल्या लोकल गाडीत अडकून पडली होती. साडेनऊच्या सुमारास तिला प्रसुतीवेदना सुरू झाल्या. महिलेला तात्काळ हॉस्पीटलमध्ये नेणे गरजेचे होते.

प्रचंड वेदना होत असल्याने ती चालू शकत नव्हती. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शेजारीच असलेल्या रिक्षा स्टँडवर जाऊन त्यांच्याकडे मदत मागितली. त्यावेळी सागर गावड (34) हा रिक्शाचालक आपली रिक्शा घेऊन थेट प्लॅटफॉर्मवर गेला. त्या महिलेला नेऊन त्याने संजीवनी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. विशेष म्हणजे काही वेळातच महिलेने बाळाला जन्मही दिला.

- Advertisement -

प्लॅटफॉर्मवर चक्क वेगात धावत असताना पाहताच अनेक प्रवाशांनी हा प्रकार मोबाईल कॅमेर्‍यात कैद केला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला. विरार रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागरला सोमवारी अटक केली. कोर्टाने सागरची सध्या जामिनावर सुटका केली आहे.

रिक्षा चालक सागर गावड यांनी दाखवलेली माणुसकीचे कौतूक होत आहे. कायद्याचे उल्लंघन करून रिक्षा थेट रेल्वे फलाटावर नेल्या कारणाने रेल्वेच्या कायद्यान्वये 154 आणि 159 अंतर्गत गावड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रिक्षा स्टँडमध्ये उभा असताना माझ्या जवळ दोन व्यक्तींनी मदत मागितली. माणुसकीच्या नात्याने या महिलेला मदत करण्यासाठी त्यावेळी मागेपुढे न बघता थेट रिक्षा फलाटावर नेली. असे रिक्षाचालक सागर गावड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -