घरमुंबई६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी, शिवाजी पार्कवर जमण्याबाबत रामदास आठवलेंचे मोठं वक्तव्य

६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी, शिवाजी पार्कवर जमण्याबाबत रामदास आठवलेंचे मोठं वक्तव्य

Subscribe

'कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा गर्दी करु नका'

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना या पार्श्वभूमीवर ६ डिसेंबरला धम्मचक्रप्रवर्तन दिनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर जमण्याबाबत रामदास आठवलेंनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत असताना केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जनतेला आवाहन केले आहे. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा गर्दी करु नका. तसेच धम्मचक्रप्रवर्तन दिनी आणि महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, असेही आठवले यांनी म्हटले आहे.

चैत्यभूमीचे ऑनालइन दर्शन देण्यासंबंधी सूचना

दरवर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत असतात. मात्र यंदा कोरोनाच संकट गंभीर असताना अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, गर्दी करु नये असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच अनुयायांना चैत्यभूमीचे ऑनालइन दर्शन देण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बनवण्याबाबत संमती

यावेळी बोलताना त्यांनी असेही सांगितले की, दादर येथील इंदू मिल या ठिकाणी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत मी आजच एमएमआरडी, शापूरजी पालनजी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. ६ आठवड्यांमध्ये स्मारकाचं काम पूर्ण होईल असे आश्वासन त्यांनी दिले असून अधिकाऱ्यांनी आंबेडकरांचं स्मारक बनवण्याबाबत संमती दर्शवली आहे असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.


राज्य सरकारने मागणी केल्यास लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची तयारी – केंद्र सरकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -