स्वतःवर गोळी झाडत मुंबईत ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. मुंबईतील भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः वर गोळी झाडली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

rest of world state prosecutor said on friday that eleven dead in mass shooting in montenegro

एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. मुंबईतील भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः वर गोळी झाडली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (On Duty Policeman Committed Suicide By Shooting Himself In Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, ताडदेव लोकल आर्म युनिट 2 मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्याम वरगडे असे मृताचे नाव आहे. त्यांची नियुक्ती भायखळा तुरुंगाच्या गेटवर करण्यात आली होती. गुरूवारी रात्री 9:20 वाजताच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलीस हवालदार श्याम वरगडे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी वरगडे यांना जे. जे. रूग्णालयात नेले. त्यानंतर रुग्णालयातील डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

स्वत:वर गोळी झाडल्यनंतर पोलीस हवालदार श्याम वरगडे यांचा जागीच मृत्यू झाला. परंचु, श्याम वरगडे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस हवालदार वारघडे हे भायखळा पोलीस ठाणेच्या बाजूस भायखळा येथे वास्तव्यास आल्याची माहिती मिळते. श्याम वरगडे यांचे कुटुंबीय गावी राहत आहेत. ते घरी एकटेच रहात होते. दरम्यान, या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


हेही वाचा – केंद्र सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी देश गहाण ठेवतंय; अरविंद केजरीवालांचा घणाघात