घरताज्या घडामोडी'अंगारक'निमित्त श्री सिद्धिविनायकाचे दर्शन 'या' वेळेत घेता येईल...

‘अंगारक’निमित्त श्री सिद्धिविनायकाचे दर्शन ‘या’ वेळेत घेता येईल…

Subscribe

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्‍यासातर्फे उद्या (१० जानेवारी) अंगारक संकष्‍ट चतुर्थीनिमित्त दिनक्रमात बदल केला आहे.

उद्या अंगारक संकष्ट चुतर्थीनिमित्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्‍यासातर्फे उद्या (१० जानेवारी) अंगारक संकष्‍ट चतुर्थीनिमित्त दिनक्रमात बदल केला आहे. (On the occasion of Angarki Sankashti Chaturthi darshan of Shri Siddhivinayak can be taken at this time Know In Marathi)

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचे वेळापत्रक

  • पहाटे १२.१० ते १.३० दरम्‍यान काकडआरती व महापूजा होणार आहे.
  • पहाटे ३.१५ ते ३.५० पर्यंत आरती होणार आहे.
  • सोमवारी मध्‍यरात्री १.३० ते पहाटे ३.१५ पर्यंत व ३.५० ते दुपारी १२ पर्यंत दर्शनाची वेळ आहे.
  • दुपारी १२.५ ते १२.३० पर्यंत नैवेद्य दाखवला जाईल.
  • सायंकाळी ७.३० पर्यंत भाविकांना श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार आहे.
  • सायंकाळी ७ वाजता दर्शनादरम्‍यानच धुपारती होईल.
  • त्‍यानंतर ७.३० ते रात्री ९.३० पर्यंत श्री सिद्धिविनायकाची महापूजा, नैवेद्य व आरती होईल.
  • रात्री ११.३० वाजता रिद्धि व सिद्धि प्रवेशद्वार बंद केले जातील.
  • त्‍यानंतर मंदिरात असलेल्‍या भाविकांचे दर्शन झाल्‍यावर शेजारती होऊन मंदिर बंद केले जाईल

मध्यरात्री दीड ते पहाटे सव्वातीन वाजेपर्यंत तसेच पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी ते दुपारी बारा वाजेपर्यंत, नंतर दुपारी साडेबारा ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आणि रात्री साडेनऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेणे भाविकांना शक्य होईल.

- Advertisement -

भाविकांसाठी सोयीसुविधा

  • श्री सिद्धिविनायक वेबसाईटद्वारे श्रींच्या दर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
  • पुरुष भाविकांकरीता रचना संसद (शाह आणि सांगी) येथून प्रवेश दिला जाईल.
  • महिला भाविकांकरीता सिल्वर अपार्टमेंट येथून प्रवेश देण्यात येईल.
  • दुरून श्रीदर्शनाची व्यवस्था आगार बाजार येथून एस के बोले मार्ग व श्री सिद्धिविनायक सोसायटीच्या प्रवेशद्वारातून करण्यात आली आहे.
  • रांगेकरीता मंडप व रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • भाविकांच्या सोयीसाठी मोफत चप्पल स्टँडची व्यवस्था मंडपातच करण्यात येणार आहे.
  • मंदिरातर्फे रुग्णवाहिका पाणपोई तसेच महापालिकेतर्फे फिरती नैसर्गिक विधीची व्यवस्था म्हणजेच मोबाईल टॉयलेटची सोय करण्यात येणार आहे.
  • भाविकांच्या मार्गदर्शनासाठी मंदिरातर्फे विविध सूचनाफलक, मार्गदर्शिका फलक लावले जातील.

भाविकांनी श्रींच्या दर्शनाकरीता येताना कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू (कॅमेरा, लॅपटॉप, मोठी बॅग इत्यादी) आणू नये. भाविकांना न्यास समितीमार्फत विनंती करण्यात येत आहे की त्यांनी मंदिरात प्रवेश करताना आपापले भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल फोन बंद करावे. विकलांग, गरोदर महिला, वयोवृद्ध व्यक्ती यांना एस के बोले मार्ग येथील पदापथावर उभारण्यात येणाऱ्या मंडपातून प्रवेश देण्यात येणार आहे, असे न्यासाकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – राज्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा, छगन भुजबळ यांची मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -