एकाच क्लिकमध्ये पेमेंट, यूपीआय व्यवहार करणे झाले सोपे

मुंबई : पेटीएमने नुकतीच युपीआय लाईट सेवा सेवा सुरू केली आहे. यामुळे वापरकर्त्यांना एका क्लिकवर पेमेंट करता येणार आहे. भारतातील स्वदेशी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) देखील युपीआय लाइटसह कार्यरत झाली आहे. यामुळे वापरकर्त्यांना अल्ट्रा-स्पीडी युपीआय पेमेंट प्रदान करणे सोपे होणार आहे, जे कधीही अयशस्वी होणार नाही. युपीआय वापरकर्ते सुलभ व्यवहारांसाठी त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँक बचत खात्यांशी जोडलेली त्यांची युपीआय लाइट खाती सुरू करू शकतात. यामुळे वापरकर्ते एका क्लिकवर रु. 200 पर्यंत जलद आणि अखंड पेमेंट करू शकतात.

पेटीएम पेमेंट्स बँकेने आज पेटीएम युपीआय लाइटवर 2 दशलक्ष वापरकर्ते जोडण्याची घोषणा केली आहे. बँकेने पेटीएम अॅपद्वारे पेटीएम यूपीआय लाईटसाठी दररोज अर्धा दशलक्ष व्यवहारांची नोंद केली आहे. यामुळे पेटीएम सेवची वाढती लोकप्रियता दिसून येत आहे.

पेटीएम युपीआय लाइट सिंगल-क्लिक पेमेंट्सची सुविधा देते. यामुळे बँकांना सुरू असण्याच्या कालावधीत समस्या असतानाही कधीही अपयशस्वी होत नाहीत. ही सेवा सुरू झाल्यानंतर युपीआय लाइट रु. 200 पर्यंतचे झटपट व्यवहार सक्षम करते, यामुळे वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळतो. युपीआय लाइटमध्ये दररोज कमाल 2,000 रुपये भरता येऊ शकतात. यामुळे दररोज एकूण ४००० रुपयांपर्यंत मूल्याचा वापर करता येऊ शकतो.

पेटीएम यूपीआय अखंड पेमेंटसाठी अत्याधुनिक युपीआय लाइट तंत्रज्ञानाद्वारे जोडलेली असून 3-स्तर बँक-श्रेणी सुरक्षा प्रदान करते. तसेच, युपीआय लाइट वापरून केलेली पेमेंट पासबुकमध्ये दिसून येणार नाही, कारण यूपीआय लाइट बॅलन्समध्ये पैसे भरताना फक्त एकाच एंट्रीची नोंद होते.

पेटीएम बँक यूपीआयमधील सर्वात मोठी योगदान देणारी आणि फायदेशीर बँक म्हणून पहिल्या क्रमांकाची बँक असण्यासोबत आघाडीची अग्रगण्य पैसे पाठवणारी बँक देखील आहे. युपीआय लाइट लाँच करणारी पहिली पेमेंट बँक म्हणून, बँकेने आपल्या वापरकर्त्यांसाठी तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्याची आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे.

पेटीएम यूपीआय लाईट कसे सेट करावे?
१. पेटीएम अॅप सुरू करा आणि ‘यूपीआय लाइट’वर क्लिक करा.
२. यूपीआय लाइटसाठी पात्र असलेला ‘बँक अकाऊंट’ निवडा आणि ‘पुढे जा’वर टॅप करा.
३. ‘अॅड मनी टू अॅक्टिव्हेट यूपीआय लाइट’ पेजवर यूपीआय लाइटमध्ये भरावयाची रक्कम नमूद करा.
४. यानंतर यूजर्स पेटीएम यूपीआय लाईट वापरणे सुरू करू शकतात.