मालवणी येथे बस अपघातात एकाचा मृत्यू

शुक्रवारी सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास मार्गक्रमण करीत असताना कपोल बँक, मार्वे रोड, मार्वे नाका येथे आंब्रे (२९)ही व्यक्ती बसच्या मागील चाकाखाली अचानक आल्याने झालेल्या अपघातात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली.

One dies in bus accident at Malvani Mumbai

बेस्ट उपक्रमाच्या एका बसखाली आल्याने लुहार आंब्रे (२९) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड स्थानक ते मालवणी बेस्ट उपक्रमाची बस मार्ग २७३ ही बस ( एम.एच.०१ – डी. आर.१६३९) शुक्रवारी सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास मार्गक्रमण करीत असताना कपोल बँक, मार्वे रोड, मार्वे नाका येथे आंब्रे (२९)ही व्यक्ती बसच्या मागील चाकाखाली अचानक आल्याने झालेल्या अपघातात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्यांना तात्काळ कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ( जुने शताब्दी) जखमी अवस्थेत उपचरासाठी दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी, पोलीस, बेस्ट अधिकारी अधिक तपास करीत आहेत. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.


हेही वाचा – Ambani Scorpio scare : NIA ला मुंबईवर भरवसा नाय ! पुणे फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल