घरमुंबईचेंबूरमध्ये घराचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू चार जण जखमी

चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू चार जण जखमी

Subscribe

चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत घराचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहेत. अशा परिस्थितीत जागोजागी इमारत तसेच घराचे छप्पर कोसळल्याच्या घटना समोर येतात. त्यातच आज चेंबूरमधील ही घटना समोर आली आहे.

- Advertisement -

या घरात पोटमाळ्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच ढिगारा काढण्यात येत आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून जखमींना राजावडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

हेही वाचा –

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ठाण्यात अनधिकृत बांधकामांना उधाण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -