मुंबई : कुलाबा परिसरातील एका ज्वेलर्सच्या पत्नीची सुमारे दहा लाखांची फसवणूक झाली. मोबाइल हॅक करून अज्ञात सायबर ठगाने तिच्या क्रेडिट कार्डावरून ही रक्कम ट्रान्स्फर केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध कुलाबा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (one million defrauded from jeweller’s wife; money transfer done from credit card by hacking mobile)
तक्रारदार महिला ही तिच्या कुटुंबियंसोबत कुलाबा परिसरात राहते. तिचे पती ज्वेलर्स असून त्यांचे एक ज्वेलर्स शॉप आहे. गेल्या महिन्यांत तिच्या घरी बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड आले. मात्र तिने ते पाकीट उघडले नव्हते. याच दरम्यान तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तीस दिवसांत कार्ड ऍक्टिव्ह करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याच्या सांगण्याप्रमाणे तिने सर्व प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी त्याने तिला एक क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले. तिने कॉल केला, मात्र समोरुन कोणीच प्रतिसाद दिला.
हेही वाचा – Baba Siddique : सिद्दिकी हत्याप्रकरणी आणखी एक अटक; भारत – पाकिस्तान सीमेवरील गावातून घेतले ताब्यात
याच दरम्यान तिचा मोबाइल हॅक करून अज्ञात सायबर ठगाने तिच्या कार्डवरुन दहा लाख रुपयांचे दोन ऑनलाइन व्यवहार केले. बँकेत गेल्यानंतर तिला हा प्रकार समजताच तिने तिचे कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर तिने कुलाबा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगांचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून समांतर तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. (one million defrauded from jeweller’s wife; money transfer done from credit card by hacking mobile)
हेही वाचा – Sanjay Raut : ही निवडणूक आयोगाची नौटंकी…संजय राऊत का भडकले?
Edited by : Ashwini A. Bhatavdekar