Corona : डोंबिवलीत आणखी एक कोरोनाग्रस्त, हॉस्पिटल कर्मचाऱ्याला लागण

डोंबिवलीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १० वर गेली असून हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Dombivli MIDC companies sued for safety audit

मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात ही व्यक्ती राहत आहे. त्यामुळे डोंबिवलीत कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळपासून तो रूग्ण राहत असलेल्या सोसायटीत सॅनिटायझेशनचं काम सुरू करण्यात आलं आहे.

डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या १०वर

डोंबिवलीत आठ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असतानाच लग्न सोहळयातील एका महिलेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर कोपर परिसरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे डोंबिवली कोरोनाग्रस्तांची संख्या दहावर पोहोचली आहे. वोक्हार्ट हॉस्पीटलमध्ये कर्मचारी असलेल्या या व्यक्तीला
मागील दहा दिवसांपासून त्रास होत असल्याने त्याची चाचणी करण्यात आली. शनिवारी रात्री त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यावेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. वोकहार्ट हॉस्पिटलने स्वतःची रुग्णवाहिका पाठवत या रुग्णासह त्याची पत्नी आणि मुलाला मुंबईच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.


CoronaEffect : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला इशारा!