CoronaVirus: नवी मुंबईत आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण!

One more positive patient in navi mumbai
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी मुंबईत करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. वाशीमधील एका मौलानाला करोनाची लागण झाली आहे. आता नवी मुंबईतील करोनाचा आकडा पाचवर पोहोचला आहे. फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे या रुग्णांला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात आलेल्या ५३ नागरिकांना पालिकेने सध्या होम क्वारंटाईन केलं असल्याचं समोर आलं आहे. त्यामधील एकाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. आता त्याच्या घरातील लोकांची देखील करोना चाचणी केली असून अजून रिपोर्ट आले नसल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढता दिसत आहेत. त्यामुळे राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. आतापर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११२वर पोहोचली आहे. सांगलीतील इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर येत आहे. राज्यातील झपाट्याने वाढणारी करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. देशभरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली.


हेही वाचा – CoronaVirus: आता भाजीपाला घराजवळ उपलब्ध करून देणार