घरCORONA UPDATECoronavirus: शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाला कोरोना

Coronavirus: शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाला कोरोना

Subscribe

शिवसेनेच्या वरळीतील नगरसेविकाला कोरोनाचा लागण झालेली असतानाच आता कुर्ल्यातील एका नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर येत आहे. कुर्ला साकिनाका परिसराचे प्रतिनिधित्व करणारे हे नगरसेवक असून त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगरसेवकाच्या कुटुंबातील अन्य तिघा व्यक्तींमध्येही अशाचप्रकारची लक्षणे दिसून येत असून त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

वरळी कोळीवाड्यातील शिवसेनेच्या नगरसेविकेला मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या पतीचेही अहवाल पॉझिटिव्ह आले होते. माजी उपमहापौर असलेल्या या नगरसेविकेला कोरोनाची बाधा झालेली असतानाच दोन दिवसांपूर्वी कुर्ला साकिनाका एल.बी.एस मार्गाच्या परिसराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकाला लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी घरीच राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर रविवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

या नगरसेवकाच्या कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले असले तरी त्यांच्या कुटुंबातील दोन ते तीन सदस्यांना याबाबतची लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची चाचणी करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सर्व नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबांची फिव्हर क्लिनिकमार्फत तपासणी करून त्यात ज्याला लक्षणे आढळून येतील, त्यांची कोविड चाचणी करण्यात यावी, असे निर्देश सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांना दिले होते. त्यानुसार प्रत्येक परिमंडळांच्या उपायुक्तांनी याबाबतचे परिपत्रक जारी करून विभागीय सहायक आयुक्तांना तसेच निर्देश दिले होते. काकाणी यांनी केवळ नगरसेवकांचीच नव्हे तर पोलीस, महापालिकेच्या चतुर्थ आणि तृतीय श्रेणीतील कामगारांची तसेच वाहन चालकांचीही तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -