घरमुंबईनवी मुंबईत आणखी एका पोलिसाची आत्महत्या

नवी मुंबईत आणखी एका पोलिसाची आत्महत्या

Subscribe

पोलीस हवालदाराने घेतला घरात गळफास

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांचे आत्महत्येचे प्रकरण ताजे असताना खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आणखी एका पोलीस कर्मचार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांच्या या दोन आत्महत्यांमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संतोष नामदेव पाटील असे त्यांचे नाव आहे. खारघर पोलीस स्टेशनमध्ये नेमणूक असलेले पोलीस हवालदार संतोष नामदेव पाटील (47) सरस्वती सोसायटी येथे सहकुटुंब राहत होते. सोमवारी राहत्या घरी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी पत्नीसह दोन मुली घरात होत्या. त्याच सोसायटीमध्ये राहणारे पोलीस हवालदार सतीश पवार यांनी त्यांना तेरणा हॉस्पीटल येथे उपचार करण्यासाठी नेले.

- Advertisement -

मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. खारघर पोलीस स्टेशन नेमणूक असलेले संतोष नामदेव पाटील हे काही दिवसांपासून आजारी असल्याने गैरहजर होते. ही घटना समजताच खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी हे घटनास्थळी पोहचले. पाटील यांचे पुढील अंतिम विधी त्यांच्या मूळगावी पाचोरा येथे होणार आहे.

रविवारी भूषण पवारसारख्या तरुण पोलीस अधिकार्‍याने स्वतःवर गोळी झाडली. त्यानंतर मध्यरात्री पोलीस हवालदाराने गळफास लावून घेतला. या दोन्ही आत्महत्यांच्या प्रकरणामुळे नवी मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -