घरताज्या घडामोडीवांद्रे येथील शास्त्रीनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू तर १८ जण...

वांद्रे येथील शास्त्रीनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू तर १८ जण जखमी

Subscribe

घटनास्थळी मध्यरात्री उशिरापर्यंत डेब्रिज उचलण्याचे व त्याखाली आणखीन कोणी अडकले आहे का , हे शोधण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ही दुर्घटना का व कशी काय घडली याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.

वांद्रे ( प.), महाराष्ट्र नगर, शास्त्री नगर येथे रात्री उशिराने इमारतवजा तीन मजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १९ जण जखमी झाले. यामध्ये, गंभीर जखमी शाहनवाज आलम (५५) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर उर्वरित १८ जखमींवर नजीकच्या भाभा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यापैकी १७ जणांनी डामा डिस्चार्ज घेतला आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांच्याकडून देण्यात आली आहे. एकूण तीन मजली लोखंडी पत्र्याचे घर अचानक कोसळले. घर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या १९ जण अडकले होते. त्यांच्या आरडाओरड्याने आजूबाजूचे लोक झोपेतून जागे झाले. ज्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली व आपल्या परीने बचावकार्य सुरू केले. काही जखमी स्वतःला सावरत उठले. एवढ्यात या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

यावेळी युद्धपातळीवर झालेल्या बचावकार्यामुळे १९ जणांना तात्काळ बाहेर काढण्यात यश आले. सर्व जखमींना लागलीच रुग्णवाहिका, मिळेल त्या वाहनाने नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी, अग्निशमन दलाबरोबर पोलीस, पालिका वार्ड कार्यालयाचे कामगार यांनी बचावकार्यात हातभार लावला. तसेच, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे यांनी व त्यांच्या टीमने मदतीसाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क व समन्वय साधून मोलाची कामगिरी बजावली.

या १९ जखमींपैकी अनेकांना शरीराला मार लागला. डोक्याला, हाताला, पायाला, तोंडाला, कमरेत मार लागला व तर काहींना जखमा झाल्या. या जखमींपैकी एक शाहनवाज (५६) या व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तर उर्वरित १८ जखमींवर भाभा व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या १८ जखमींमध्ये २ अल्पवयीन मुले, ६० वर्षांवरील ३ व्यक्ती व तरुण मुले यांचा समावेश आहे. मात्र या १८ जखमींपैकी एकजण रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित १७ जणांनी डामा डिस्चार्ज घेतला आहे. घटनास्थळी मध्यरात्री उशिरापर्यंत कोसळलेल्या घराचा ढिगारा उचलण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, ही दुर्घटना का व कशी काय घडली याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

मृत व्यक्तीचे नाव -: शाहनवाज आलम (५५)

१८ जखमींची नावे :

(१) नूर आलंम शेख (२३)

(२) महंमद शबीर शेख (४०)

(३) शमीफुल हक (३६)

(४) महंमद शातो रब (३३)

(५) जुल्फिगार शेख (३२)

(६) शमी अहमद शेख (४०)

(७) अली अहमद शेख (६५)

(८) सलीम उस्मान शेख (१६)

(९)महंमद अल्फाज शेख (६३)

(१०) महंमद नर सलाम शेख (६६)

(११) महंमद जानी फेल (३६)

(१२) जसीरुद्दीन शेख (५०)

(१३) महमंद फैजान शेख (१३)

(१४) महंमद मन्वार आलम (३६)

(१५) मंगल आलम शहाबुद्दीन शेख (४६)

(१६) महंमद एहेसान आलम (३२)

(१७) महंमद जहांगीर शेख (४६)

(१८) रशीद (३५)


हेही वाचा : बाळासाहेबांनी दिलेलं वचन मी पूर्ण करणार, नामांतरावरून मुख्यमंत्र्यांचा औरंगाबादकरांना दिलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -