घरमुंबईमराठी माणसाचं एक पाऊल पुढे, मुंबईतले मराठी तरुण वळले व्यवसायाकडे

मराठी माणसाचं एक पाऊल पुढे, मुंबईतले मराठी तरुण वळले व्यवसायाकडे

Subscribe

'लाज नाही तर अभिमान बाळगा' मनसेचे अनोखं कॅपेन सुरू

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, या कोरोनामुळे जसे जीव जात आहेत, त्याच प्रमाणत राज्यात अनेक तरुणांच्या नोकऱ्या देखील जात आहेत. मुंबईतील बऱ्याचशा कंपन्यामध्ये एकतर पगार कपात केली जात आहे किंवा कामावरून माणसे देखील कमी केली जात आहेत. याचा सर्वाधिक फटका हा सर्व सामान्य मराठी माणसाला बसला आहे. मुंबईतील मराठी माणूस आणि नोकरी हे समीकरणच जणू काही बनले आहे.

मात्र आता नोकऱ्याच जाऊ लागल्याने जगायचे कसे? हा प्रश्न पडू लागला आहे. मात्र डगमगने हा मराठी माणसाचा स्वभाव नाही. एरव्ही मराठी माणूस नोकरी शिवाय काही करू शकत नाही, असे म्हणणाऱ्यांना आता मराठी माणूस व्यवसाय देखील करू शकतो, हे दाखवून देण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. यामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुंबई, पालघर आणि ठाणे भागात अनेक तरुणांनी कांदे-बटाटे, घरगुती जेवणाची ऑर्डर, मासेविक्री, भाजी विक्री या सारखे छोटे व्यवसाय सुरू करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने देखील ही विक्री सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

उत्तर भारतीयांनी सोडली मुंबई

दरम्यान मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय छोटे, मोठे व्यवसाय करून आपले पोट भरत आले आहेत. मात्र मुंबई, ठाणे, पालघर या भागात कोरोनाचे कहर पाहता या उत्तर भारतीयांनी आपल्या गावी जाणे पसंत केले. त्यामुळे आता आपल्या हक्काच्या शहरात आपण छोटे-मोठे व्यवसाय का करू नये, असा विचार करून बऱ्याच तरुणांनी घर बसल्या छोटे-मोठे उद्योग करायला सुरुवात केली आहे.

मी एका खासगी कंपनीत काम करत आहे. मात्र नोकरी करता करता मी कांदे-बटाटे, भाजीचा व्यवसाय सुरू केला आहे. -प्रवीण कुळे, कांदा-बटाटा विक्रेता

‘लाज नाही तर अभिमान बाळगा’ मनसेचे कॅम्पेन

सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेहमीच मराठी माणसाने व्यवसायामध्ये उतरले पाहिजे, ही भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राहिलेली आहे. यामुळे आता अशा तरुणांना मनसेची साथ मिळताना दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे तर स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या तरुणाना प्रोत्साहन देत आहेत. विशेष म्हणजे लाज नाही अभिमान बाळगा हे कॅम्पेन संदीप देशपांडे यांनी सुरू केले असून, अशा तरुणांना ते फेसबुकच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहेत.

- Advertisement -

मी लॉकडाऊनमुळे घरी आहे. त्यामुळे मी सध्या नालासोपारा येथे बिस्लरी पाण्याच्या बॉटल्सचा व्यवसाय सुरू केला असून, मी सध्या नालासोपारामध्ये इमारतीमध्ये पाण्याच्या बॉटल्स पुरवतो, असे सूरज पवार या तरूणाने सांगितले.

लॉकडाऊनमुळे विमान सेवा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे आता घर कसे चालवायचे हा प्रश्न माझ्या समोर होता. मात्र आता मी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मनसेच्या मदतीमुळे हे शक्य झाले. – रोहन वडके, भाजी विक्रेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -