घरमुंबईकुर्ल्यात शौचालयाची भिंत कोसळून महिला ठार

कुर्ल्यात शौचालयाची भिंत कोसळून महिला ठार

Subscribe

तीन महिला बचावल्या

मुंबईत शौचालयांची बांधकामे जोरात सुरु असून अनेक शौचालयांच्या सुरु असलेल्या दुरुस्ती कामांमुळे लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यातच कुर्ला येथील नवपाडा परिसरातील शौचालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंत कोसळून एक महिला ठार झाली आहे. द्रौपदी परशुराम रावले (वय ५५) असे त्या महिलेचे नाव असून बाजुच्या शौचालयात गेलेल्या तीन महिलांना किरकोळ मार लागला आहे.

कुर्ला पश्चिम नवपाडा परिसरातील बाबू वडारी चाळीतील ३० वर्षे जुन्या शौचालयाच्या दुरुस्तीचे काम मागील आठवड्यात सुरू करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी साडेसातच्या  सुमारास ही दुघर्टना घडली. स्थानिक भाजप नगरसेवक हरिष भांदिग्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदाराने या शौचालयाचे पाडकाम करताना प्रथम पुरुषांसाठी असलेले शौचालये पाडले होते. त्यानंतर  महिलांसाठीचे शौचालय बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. पण सोमवारी सकाळी  या चाळीतील द्रौपदी रावले यांच्या तीन महिला येथील शौचालयात गेल्या असता अचानक ही धोकादायक भिंत कोसळून पडली महिलेसह आणखी तीन महिला या शौचालयात गेल्या होत्या.

- Advertisement -

या शौचालयाची भिंत कोसळली त्यात द्रौपदी रावले गेल्या अडकल्या. तर इतर तीन महिलांनी या आवाजाने त्वरीत सुरक्षित स्थळी धाव घेतली, त्यामुळे त्या बचावल्या. त्यातील एका महिलेच्या हाताला किरकोळ मार लागला आहे. तर दुर्घटना झालेल्या शौचालयाजवळ आणखी एका शौचालय होते. मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे या महिला जुन्या शौचालयात गेल्या. त्यानंतर ही दुर्घटना घडली, असे ते म्हणाले.

दहा वर्षात २५ ठार

मुंबईत गेल्या दहा वर्षांत सेफ्टीक टँकचा स्फोट होऊन तसेच शौचालये खचून झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत २५ महिला आणि पुरुष ठार झाले आहेत. यातील बहुसंख्य दुर्घटना गोवंडी, मानखुर्द, मंडाला, भांडुप या भागात झाल्या आहेत. त्यात आता कुर्ल्याची भर पडली आहे.

- Advertisement -

मानखुर्द

सन २०१५ : मानखुर्द
कल्पना पिंपळे

भांडुप

२०१८ : भांडुप
बाबूलाल देवाशी
नागूबाई जेठवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -