घरCORONA UPDATEमुंबईतील तळीरामांसाठी खुशखबर; उद्यापासून ऑनलाईन मद्यविक्री सुरू

मुंबईतील तळीरामांसाठी खुशखबर; उद्यापासून ऑनलाईन मद्यविक्री सुरू

Subscribe

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ४ मेपासून लॉकडाऊनचा कालावधी शिथील करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष दारुच्या दुकानांसह बिगर अत्यावश्यक सेवांची पाच दुकाने एका मार्गावर सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. परंतु महापालिकेचे तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मद्यविक्रीसह अन्य दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नाकारली होती. मात्र आता नवीन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईत ऑनलाईन मद्यविक्री सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बाटलीबंद दारू ऑनलाईन पद्धतीने केलेल्या मागणीनुसार घरपोच देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दारुची विक्री कंटेन्मेंट झोन अर्थात बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांमध्येच करता येणार आहे.

मुंबई महापालिकेने केले परिपत्रक जारी 

महाराष्ट्र शासनाने ४ मे पासून लॉकडाऊनचा कालावधी शिथील करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष काही सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. परंतु या शिथीलीकरणात लोकं अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे इतक्या दिवसांपासून आपण घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. तसेच अशा परिस्थितीत शासनाने पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून, मुंबईत फक्त पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील, असा फतवा जारी करत विभागीय सहायक आयुक्तांना यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एका दिवसांत दारूची दुकाने बंद करावी लागली होती. मात्र, मुंबई वगळता अन्य ठिकाणी दारूची दुकाने सुरु असतानाच मुंबईतील मद्यप्रेमींची गैरसोय होत होती. त्यामुळे अखेर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शुक्रवारी परिपत्रक जारी करून ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, दारूची दुकानं उघडून त्यांना याची विक्री करता येणार नाही. तर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या मागणीनुसार, ग्राहकांना त्यांच्या घरी सिलबंद मद्याच्या बाटल्यांची विक्री करता येवू शकते. परंतु, कोरोना रुग्ण आढळून आलेल्या बाधित क्षेत्रात अथवा सिलबंद इमारतीत या मद्यविक्रीचा पुरवठा करता येवू शकणार नाही, असे आयुक्तांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत ६ हजार नवे रुग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -