घरमुंबईमुंबई विद्यापीठाची २५ ऑगस्टला ऑनलाईन सिनेट

मुंबई विद्यापीठाची २५ ऑगस्टला ऑनलाईन सिनेट

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी २५ ऑगस्टला झूम अ‍ॅपद्वारे सिनेट सभा घेण्याच्या निर्णय घेतला होता. गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर सिनेट पुढे ढकलण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली होती. मात्र कुलगुरूंनी आपल्या निर्णयावर ठाम राहत सिनेट २५ ऑगस्टला घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार वर्षातून दोन वेळा सिनेट सभा घेणे विद्यापीठांना बंधनकारक असते. त्यानुसार पहिली सिनेट १३ मार्चला झाल्यानंतर दुसरी सिनेट सभा २५ ऑगस्टला झूम अ‍ॅपद्वारे घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने जाहीर केला होता. झूम अ‍ॅपवरील बैठकीत सदस्यांना त्यांच्या सभागृहातील आयुधांचा वापर करता येणार नाही. झूम अ‍ॅपवर हरकतीचे मुद्दे, स्थगन प्रस्ताव मांडणे, सभागृह स्थगित करणे शक्य नाही. तसेच गणेशोत्सवामुळे अनेक सदस्यांना सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. अनेक सदस्य हे लॉकडाऊनपूर्वी गावी गेले असून, त्यांना तिथे नेटवर्कची समस्या असल्याने त्यांना झूमद्वारे उपस्थित राहता येणार नाही. ऑनलाईनद्वारे समस्या सोडवणे शक्य नसल्याने गणेशोत्सवानंतर सिनेट घेण्यात यावी, अशी मागणी युवासेनेकडून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना केली होती. मात्र कुलगुरू आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने सिनेट २५ ऑगस्टला होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -