घरCORONA UPDATEरेल्वेकडून २४७ मोटरमनला ऑनलाईन प्रशिक्षण

रेल्वेकडून २४७ मोटरमनला ऑनलाईन प्रशिक्षण

Subscribe

लॉकडाऊन काळात २४७ मोटरमनला प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी मुंबईची जीवनवाहिनी बंद होती. तरी सुध्दा लॉकडाऊनकाळात मुंबईतील मोटरमनच्या ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच काम रेल्वेकडून सतत सुरु आहे. एसपीएडी (सिग्नल पासिंग एट डेंजर) आणि प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंग टाळण्यासाठी आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या खबरदारीसाठी मुंबई मोटरमन ट्रेनिंग सेंटर, कुर्ला यांनी मोटरमन आणि गार्ड्सचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरु ठेवले आहे. लॉकडाऊन काळात २४७ मोटरमनला प्रशिक्षण देण्यात आले आहे.

उपनगरी विभागातील मोटरमनला कामाच्या खुप तान असते. कारण प्रवाशांना सुरक्षित ने-आन करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी त्यांच्या खाद्यांवर असते. प्रत्येक मोटरमनला लोकल चालवत असताना दररोज ३०० पेक्षा अधिक सिग्नलवर लक्ष द्यायचे असते. त्यामुळे त्यांना लोकल चालवत असताना नेहमी मोटरमन सतर्क राहावे लागते. देशातील इतर रेल्वे विभागात दोन सिग्नलमधील किमान अंतर कमीत कमी एक किलोमीटर आहे, तर मुंबईत ते अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे मोटरमन, गार्डचे प्रशिक्षण आवश्यक असते. यामध्ये रेकच्या सर्व तांत्रिक आणि समस्या-निवारणाचे ज्ञान, ऑपरेटिंग तांत्रिक ज्ञान, संरक्षा बाबत माहिती, मार्गाचे ज्ञान, प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंग, आगामी मान्सूनची खबरदारी आणि एसपीएडी (सिग्नल पासिंग अट डेंजर) टाळण्यासाठी मोटरमनला वेळोवळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वेळोवेळी मोटरमन आणि गार्डला प्रशिक्षण आणि ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक आहे. लॉकडाऊन पुर्वी मोटरमनला ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जात होते. मात्र लॉकडाऊनमुळे मोटनमन आणि गार्ड्ससाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास रेल्वेने सुरुवात केली होती. २१ दिवसांचा रीफ्रेशर ट्रेनिंग कोर्स, १० आठवड्यांचा प्रमोशनल कोर्स, एक दिवसाचा इंटेन्सिव्ह कोर्स असे तीन अभ्यासक्रम ऑनलाईन घेण्यात येत आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमातील मोड्यूलमध्ये ऑनलाइन वर्ग प्रशिक्षण तसेच प्रॅक्टिकल प्रशिक्षण आहे. प्रॅक्टिकल प्रशिक्षण लोकल ट्रेनमध्ये एकावेळी तीन मोटरमनच्या बॅचसाठी दिले जाते.

२४७ मोटरमनला प्रशिक्षण

८ मे ते १३ जून दरम्यान १६२ प्रशिक्षणार्थींना एक दिवसीय इंटेन्सिव्ह कोर्स प्रशिक्षण देण्यात आले. दररोज १० प्रशिक्षणार्थी घरून ऑनलाइन प्रशिक्षण वर्गात सहभागी होतात आणि इतर ऑनलाईन अभ्यासक्रमांत ८५ कर्मचारी सहभागी असतात. लॉकडाऊन कालावधीत एकूण २४७ मोटरमनने प्रशिक्षण घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -