Eco friendly bappa Competition
घर CORONA UPDATE Covid-19 Vaccine : मुंबईत १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला अल्पप्रतिसाद, दिवसभरात...

Covid-19 Vaccine : मुंबईत १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला अल्पप्रतिसाद, दिवसभरात फक्त १२४ मुलांचे लसीकरण

Subscribe

केंद्र सरकारने देशातील १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासून मुंबईत १२ प्रायोगिक तत्त्वावरील केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र काही केंद्रांवर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला व लसीकरण सुरू होण्यास काहीसा उशीर झाला.

केंद्र सरकारच्या आदेशाने मुंबईत आजपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Children Covid-19 Vaccination )  १२ केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे दिवसभरात फक्त १२४ मुलांचेच लसीकरण झाल्याची माहिती पालिकेकडूनच प्राप्त झाली आहे. (only 124 children ages of 12 and 14 have been vaccinated In Mumbai today)  त्यामुळे पहिल्याच दिवशी लसीकरणाला अतिशय अल्पप्रतिसाद लाभला आहे. मुंबईत कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेला रोखण्यात पालिका आरोग्य यंत्रणेला चांगलेच यश आले आहे. मात्र जगभरात कोविडची चौथी लाट येण्याची चर्चा सुरू आहे. त्यातच चीनमध्ये पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करावे लागले आहे.

केंद्र सरकारने देशातील १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासून मुंबईत १२ प्रायोगिक तत्त्वावरील केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र काही केंद्रांवर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला व लसीकरण सुरू होण्यास काहीसा उशीर झाला. मात्र दिवसभरात सदर १२ केंद्रावर फक्त १२४ मुलांचे लसीकरण झाल्याची नोंद पालिका आरोग्य यंत्रणेकडे झाली आहे. पहिल्याच दिवशी लसीकरणाला अतिशय अल्प प्रतिसाद लाभल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबईसह देशभरात आजपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत नियोजित १२ केंद्रांवर प्रायोगिक लसीकरण करण्यात आले. मात्र काही ठिकाणी लसीकरणाला उशिराने सुरुवात झाल्याने लसीचा लाभ घेणाऱ्या मुलांचा व त्यांच्यासह आलेल्या पालकांचा बराच वेळ वाया गेला.  पालिकेच्या राजावाडी सारख्या रुग्णालयात लसीकरण उशिरा सुरु झाले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना दीड ते दोन तास ताटकळत राहावे लागले.

वास्तविक, कोवीन ऍपवर स्लॉट मिळत नव्हता. त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाल्याशिवाय लसीकरण सुरु नका, असा संदेश दिला. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण कसे करावे याच्या सूचना दिल्या जाणार होत्या. ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दुपारी २ च्या दरम्यान संपली त्यानंतर राजावाडी व अन्य काही केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली.


- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटलीच; आज 44 नवे रुग्ण, 1 मृत्यू

- Advertisment -