घरमुंबईकोरोनामुक्तीकडे वाटचाल! धारावीमध्ये अवघ्या एका कोरोनाबाधितांची नोंद

कोरोनामुक्तीकडे वाटचाल! धारावीमध्ये अवघ्या एका कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

मुंबईतील रुग्णसंख्येत गेल्या अनेक दिवासांपासून चढ उतार होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या वर्षभरापूर्वी मुंबईतील धारावी हा परिसर कोरोनाचा शिरकाव केल्यानंतर हॉटस्पॉट ठरला होता. परंतु तीच धारावी आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे झाल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी दिवसभरात धारावीमध्ये अवघ्या एका कोरोनाबाधित रूग्णाची नोंद करण्यात आली आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केले असताना आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. मात्र या ठिकाणी मुंबई परिसरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात ओसरताना दिसत आहे. दरम्यान, धारावीमध्ये कोरोनाचा अवघा एक रुग्ण आढळून आल्याची नोंद आज करण्यात आली आहे. ही खूपच सकारात्मक बाब आहे. धारावी परिसरात सध्या १९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईची रुग्णसंख्या गेल्या आठवडाभरापासून १ हजारांच्या आत नोंदवण्यात येत असली तरीही मुंबईत बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठा चढ उतार पहायाला मिळत आहे. आजही मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या अधिक आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची आणि बाधितांची संख्या जवळपास सारखी आहे. मुंबईत आज ९६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर केवळ ८९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ७ लाख ८ हजार ९६८ इतकी झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजार ९६५ इतकी आहे. आज मुंबईत २७ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -