घरमुंबईसततच्या पावसामुळे ओपीडी रुग्णांत ६० टक्क्यांनी घट

सततच्या पावसामुळे ओपीडी रुग्णांत ६० टक्क्यांनी घट

Subscribe

मुंबईत सतत पडलेल्या पावसामुळे सरकारी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सरकारी आणि पालिकेच्या हॉस्पिटलमधील ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सतत पडलेल्या पावसामुळे ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ६० टक्क्यांनी घट झाली आहे. शनिवार, ७ जुलैच्या पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी संध्याकाळी थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली. सतत पडलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम सर्वात जास्त रेल्वे वाहतूकीवर झाला. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना ‘त्या’ चार दिवसांमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठावं लागलं. त्यामुळे वेगवेगळ्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांनाही त्याचा फटका बसला. मुंबईतील विविध हॉस्पिटल्समधून मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये येणं टाळल्याच निदर्शनास आलं आहे.

दिवसाला ४ हजार रुग्ण

साचलेल्या पाण्यातून आल्यानंतर इंन्फेक्शन होण्याची आणि एवढ्या पावसात अडकण्याचीही भीती मुंबईकरांना वाटत होती, अशी प्रतिक्रीया एका डॉक्टरने दिली असून शंभरहून अधिक रुग्णांनी दूर राहत असल्याच्या कारणाने उपचारांसाठी येणं टाळल्याचही त्यांनी म्हटलं आहे. जे.जे. रुग्णालयात दिवसामागे ४ हजार रुग्ण ओपीडीत येतात. तर २५० ते ३०० रुग्ण अंतर्गत रुग्ण विभागात येतात. मात्र हे प्रमाण पाऊस पडल्यामुळे कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

सर्दी, खोकला, तापाच्या तक्रारी

याविषयी जे.जे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ओपीडीला १ हजार ८२३ रुग्ण आले होते. त्यापैकी फक्त ९३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं. मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरीही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. पण, त्या ४ दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे रुग्णांचं प्रमाण कमी झाल्याच समजतं. पण, आता ही संख्या वाढली असून पाऊस थांबल्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे अस्थमा, दमा, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. शुक्रवार, १३ जुलै रोजी २ हजार ९६२ रुग्णांची ओपीडीत आणि अंतर्गत विभाग ओपीडीमध्ये १६४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

केईएम, नायरचीही परिस्थिती सारखीच

केईएम हॉस्पिटलमध्येही मंगळवारच्या ओपीडीत हेच चित्र पाहायला मिळालं. केईएम आणि नायर हॉस्पिटलमधील प्रत्येक ओपीडीत ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण येतात. पण, केईएममध्ये १ हजार ४६० रुग्णांची ओपीडीत नोंद करण्यात आली. तर, नायर रुग्णालयातील ओपीडीत फक्त ४०० रुग्ण आले होते. त्यामुळे सतत पडलेल्या पावसामुळे ओपीडीतील रुग्णांमध्ये ६० टक्क्यांनी घट झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

थंडी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

सततच्या पावसामुळे आणि वातावरणाच्या बदलामुळे थंडीतापाच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. त्यासोबत व्हायरल इंन्फेक्शन, कावीळ, टायफॉईड, अंगदुखी, पोटदुखी असे आजार असलेल्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, असं आवाहन डॉ. सुरासे यांनी केले आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -