घरमुंबईअभ्यासक्रम विविध कॉलेजांमधून करण्याची संधी

अभ्यासक्रम विविध कॉलेजांमधून करण्याची संधी

Subscribe

विद्यार्थ्यांसाठी बहुशाखा प्रयोगाची यूजीसीकडून चाचपणी

एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर तो अभ्यासक्रम त्याच कॉलेजमधून पूर्ण करणे विद्यार्थ्यासाठी बंधनकारक असते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांला नाहक त्रास सहन करावा लागतो. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) राबवण्यात येत असलेल्या बहुशाखा अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांल त्याचा स्वत:च अभ्यासक्रम ठरवण्याबरोबरच त्याला तो एकाच कॉलेजमधून पूर्ण करणे बंधनकारक असणार नाही. या प्रयोगाची चाचपणी सध्या सुरू असून काही विद्यापीठांमध्ये चाचणी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

यूजीसीकडून ‘नॅशनल अकॅडमिक क्रेडीट बँक’ची स्थापना करून त्यात विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने घेतलेल्या अभ्यासक्रमापासून ते त्याने त्यात मिळवलेल्या प्राविण्याची नोंद यामध्ये ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना एकावेळी अनेक अभ्यासक्रम शिकता येणार आहे. विज्ञान शाखेत शिक्षण प्रवेश घेणार्‍या एखाद्या विद्यार्थ्याला इतिहासाचा अभ्यास करावायाचा असेल तर तो पर्याय त्याला या माध्यमातून खुला होणार आहे. तसेच या विद्यार्थ्याला दुसर्‍या शाखेत पाहिजे तो विषय शिकत असलेल्या संस्थेत उपलब्ध नसेल तर तो दुसर्‍या संस्थेत जाऊनही घेण्याची मुभा यात असेल असे आयोगाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. याचबरोबर विद्यार्थ्याला काही काळ थांबून एखाद्या वेगळा अभ्यासक्रम किंवा स्टार्टअप असे काही करायचे असेल तर तो ‘नॅशनल अकॅडमिक क्रेडीट बँक’मध्ये नोंद करून अभ्यासक्रमातून काही काळ सुट्टी घेऊ शकतो. तो विद्यार्थी परत अभ्यासक्रम करू इच्छित असेल तेव्हा तो या वेबसाइटवर पुन्हा लॉगइन करून पुढचा अभ्यासक्रम सुरू करू शकतो. याचा प्रायोगिक प्रयोग सुरू करण्यात येणार असून याच्या यशानंतर त्याच्या अंमजबजावणीबाबत अंतिम निर्णय होईल अशी माहितीही या अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisement -

या योजनेमुळे देशातील उच्च शिक्षणाची नवी कवाडे खुली होतील तसेच उच्च शिक्षणाला नवे बळ मिळेल. तसेच शैक्षणिक संस्थांना अधिक विद्यार्थीस्नेही शिक्षण द्यावे लागणार असल्याचे आयोगाने या योजनेच्या संकल्पपत्रात स्पष्ट केले आहे. ‘नॅशनल अकॅडमिक क्रेडीट बँक’ योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. या बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे क्रेडीटची नोंद करणे, ते विद्यार्थ्याच्या इच्छेनुसार संस्थांमध्ये ट्रान्सफर करणे आणि वेळप्रसंगी क्रेडीट कमी करणे हे महत्त्वाचे काम
होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -