घरमुंबईनिवडणुकांसाठीच 'ईडी'चा प्रकार – धनंजय मुंडे

निवडणुकांसाठीच ‘ईडी’चा प्रकार – धनंजय मुंडे

Subscribe

'निवडणूका डोळ्यांपुढे ठेवून भाजप सरकारने त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्याचा प्रकार केला असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

निवडणूका डोळ्यांपुढे ठेवून भाजप सरकारने त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्याचा प्रकार केला आहे. सरकारच्या या हुकूमशाहीविरोधात पवार साहेब जो लढा देत आहे. तो त्यांचा एकट्यांचा लढा नसून तो सर्व जनतेचा लढा आहे‘, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘शरद पवारांची ५५ वर्षांची स्वच्छ राजकीय कारकीर्द राज्यातील १२ कोटी जनतेच्या समोर आहे. पवार यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणाशी काहीही संबंध नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने हा ईडी प्रकार केला जात आहे‘.

पवारांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर शरद पवार हे आज स्वतः हा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार होते. त्यावेळी त्यांच्या सोबत निघालेल्या मुंडे यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना सरकारच्या मनमानी कारभारावर टीका केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजप अशा प्रकारे कारवाई करत आहे. या देशात लोकशाही राहिली आहे की नाही, भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे आणि हे सहनशीलतेच्या पलीकडचं आहे,’ असं ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ईडीमध्ये जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब – शरद पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -