घरताज्या घडामोडीविरोधकांची विधानभवनात पायऱ्यांवर घोषणाबाजी, देवेंद्र फडणवीसही सहभागी

विरोधकांची विधानभवनात पायऱ्यांवर घोषणाबाजी, देवेंद्र फडणवीसही सहभागी

Subscribe

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात येण्याच्या वेळी ही घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गोपाळ शेट्टी, प्रसाद लाड आदी भाजपचे प्रमुख नेते आणि आमदार घोषणा देत होते.

‘पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्ताव येणार’

राज्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम सरकारनं केलं आहे. २५ हजार रुपये हेक्टरी मदत सरकारने द्यायला हवी. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीच आम्ही आज इथे बसून घोषणाबाजी करत आहोत, असं यावेळी भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. सरसकट कर्जमाफी, महिलांची सुरक्षा आणि शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत या मुद्द्यांवर पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

सरकारने दिलेलं एकही आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही. कर्जमाफीसाठी अनेक अटी टाकल्या आहे. शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिका सरकारने केली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी जमलो आहोत. जनतेच्या मनातला आक्रोश सभागृहात मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते, विधानसभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -