घरताज्या घडामोडीमोकळ्या जागांच्या देखभालीची जबाबदारी एनजीओ,कार्पोरेटकडे देण्यास भाजपचा विरोध

मोकळ्या जागांच्या देखभालीची जबाबदारी एनजीओ,कार्पोरेटकडे देण्यास भाजपचा विरोध

Subscribe

मुंबईतील अनेक आरक्षित खेळाची मैदाने, क्रिडांगणे, मनोरंजन मैदानांच्या मोकळ्या जागा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्यानंतर याला पुन्हा एकदा भाजपने तीव्र विरोध केला आहे.

मुंबईतील अनेक आरक्षित खेळाची मैदाने, क्रिडांगणे, मनोरंजन मैदानांच्या मोकळ्या जागा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्यानंतर याला पुन्हा एकदा भाजपने तीव्र विरोध केला आहे. मुंबईतील मोकळ्या जागांची देखभाल ही खासगी स्वयंसेवी संस्था, एएलएम तसेच कार्पोरेट कंपन्यांना यांना न देता त्या केवळ रेसीडेन्स असोशिएशन्सकडे दिली जावी, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे.

देखभालीची जबाबदारी रेसीडेन्स असोशिएनकडे सोपवा

मुंबईतील सुमारे खेळाची मैदाने, क्रिडांगणे, मनोरंजन मैदान आदी २१६ आरक्षित मोकळ्या जागांपैकी काही जागा विविध संस्थांच्या ताब्यात असल्याने त्या विविध संस्थांच्या ताब्यातून परत घेण्यात आल्या. मात्र, या मोकळ्या जागा ताब्यात घेतल्यानंतरही अजूनही सुमारे २५ ते २८ मोकळ्या जागा ताब्यात घेण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. या जागा ताब्यात न घेताच प्रशासनाने यासाठी सुधारीत धोरण आणून त्या जागा पुन्हा ११ महिन्यांकरता विविध संस्था तसेच कंपन्यांना देखभालीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मोकळ्या जागा खासगी संस्थांच्या ताब्यात जाऊ नये, अशी भूमिका घेत भाजपचे अंधेरी पश्चिम येथील आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत या मोकळ्या जागा खासगी स्वयंसेवी संस्था, एएलएम तसेच कार्पोरेट संस्थांना देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. याऐवजी मोकळ्या जागांची देखभाल रेसिडेन्स असोशिएशनला देण्यात यावी, अशी मागणी साटम यांनी केली. मात्र, या मोकळ्या जागा देताना विभागीय सहायक आयुक्त यांच्या परवानगीनेच दिले जावे, अशीही सूचना त्यांनी यावेळी केली आहे.

- Advertisement -

मात्र, मोकळ्या जागांची देखभाल ही महापालिकेने स्वत:च करावी. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी असणार्‍या महापालिकेने या मोकळ्या जागांच्या देखभालीसाठी एनजीओ तथा कंपन्यांवर जबाबदारी टाकणे योग्य नाही. त्यामुळे स्वत: विकास करून रेसीडेन्स असोशिएशनवर त्याची जबाबदारी टाकल्यास उद्याने आणि मैदानांचा विकास चांगल्याप्रकारे होऊन नागरिकांना चांगल्याप्रकारच्या सुविधा प्राप्त होती. तसेच उद्यानांचा विकास आणि देखभाल आदींचा समावेश बंधनकारक कर्तव्यांमध्ये केला जावा,अशीही सूचना आयुक्तांना केल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – भ्रष्टाचार करणाऱ्या अभियंत्यांची बढती मुंबई महापालिकेने रोखली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -