Air India Employees: एअर इंडियाचे कर्मचारी अडचणीत, क्वाटर्स खाली करण्याचे आदेश

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती जवळपास १६०० कर्मचारी आहेत

Order to vacate Air India staff quarters air india employee strike november 2
Air India Employees: एअर इंडियाचे कर्मचारी अडचणीत, क्वाटर्स खाली करण्याचे आदेश

एअर इंडियाचे खासगीकरण झाल्यानंतर कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांना वसाहती खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणात नाराज झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांना नोटीस दिल्यानंतर एअर इंडियाचे एम्प्लॉइज यूनियन,एविएशन इंडस्ट्री एम्प्लॉइज गिल्ड आणि ऑल इंडिया सर्विस इंजीनीअर्स एसोसिएशनने कंपनीच्या या निर्णयावरुन अनिश्चित काळासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना त्यांची कॉटर्समधील जागा खाली करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या २ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी याबाबत एअर इंडियाच्या जनरल मॅनेजर मीनाक्षी कश्यप यांना एक पत्र देखील लिहिले आहे.

मुंबईतील कलिना परिसरात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत त्यात जवळपास १६०० कर्मचारी आहेत. त्यांचे एकूण कुटुंबिय मिळून एकूण ६ हजार जण या वसाहतींमध्ये राहत आहेत. ५ ऑक्टोबर रोजी त्यांना एक नोटीस मिळाली ज्यात कंपनीचे प्राइव्हटाइझेशन झाल्याने २० ऑक्टोबरपर्यंत कर्मचारी वसाहती खाली करत असल्याचे हमीपत्र लिहून द्या. या कालावधीत हमीपत्र न दिल्यास कर्मचाऱ्यांवर अधिकृत कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अचानक वसाहतींमधून बाहेर पडण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कंपनीने वसाहत सोडण्याच्या मोबदल्यात कर्मचाऱ्यांना एचआरए दिला जात नाही. वसाहत सोडल्यानंतर कमी पैशांत मुंबईत चाळीत देखील घर घेणे शक्य नाही. त्यामुळे कर्मचारी आता जाणात कुठे याचा सरकारने विचार करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

हवाई वाहतूक मंत्रालयाने एअर इंडिया विमानतळाचे प्राईव्हटाइझेशन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आता कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या आत वसाहती सोडण्याचे आदेश दिले आहेत. ऑल इंडिया सर्विस इंजीनीअर्स एसोसिएशनचे अध्यक्ष विलास गिरीधर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीत एअर इंडिया कर्मचाऱ्यांची कॉलनी एअरपोर्ट जवळ असल्याने त्या काळात एअर इंडियाची सेवा सुरळीत सुरू राहिली. सध्या एअर इंडियामध्ये १२ हजार ८५ कर्मचारी आहेत. त्यातील ८ हजार ८४ कर्मचारी हे कायमस्वरुपी काम करणारे कर्मचारी आहेत तर ४ हजार १ कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर आहेत.


हेही वाचा – Petrol Diesel Price: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक