घरमुंबईभांडूपचा बाप्पा सांगतोय अवयवदानाचं महत्त्व

भांडूपचा बाप्पा सांगतोय अवयवदानाचं महत्त्व

Subscribe

जंगल मंगल या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाने अवयवदानाचा संदेश दिला आहे.

मुंबईच्या भांडूप येथील जंगल मंगल या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा यंदा अवयवदानाबाबत माहिती देत असल्याचा देखावा उभारण्यात आला आहे. सरकारकडून केल्या जाणाऱ्या अवयवदान जनजागृतीमध्ये या मंडळाने खारीचा वाटा घेत अवयवदानाचं महत्व लोकांना पटवून देण्यासाठी हा देखावा साकारला आहे.

सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न

गणेशोत्सवात अनेक मोठमोठी मंडळं वेगवेगळे उपक्रम राबवण्यासोबतच देखावे करण्यातही भर देतात. यात आता छोटी मंडळेही मोठ्या प्रमाणात सहभाग घेताना दिसत आहेत. हे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांच्या रांगा लागतात. तसेच सामाजिक संदेश देण्यासाठी देखावा हा एक उत्तम पर्याय असू शकतो. या विचाराने जंगल मंगल या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा भक्तांसाठी अवयवदानाचा देखावा सादर करण्यात आला आहे. अवयवदान, देहदान, ग्रीन कोरिडॉर या सर्वांचं महत्त्व किती आहे, हे या देखाव्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

- Advertisement -

ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजूंना नव्याने आयुष्य मिळू शकतं. पण समाजात आजही अवयवदान करण्याबाबत गैरसमजुती आहेत. लोकं अवयवदान करण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाहीत आणि वेळीच अवयव न मिळाल्याने रुग्ण दगावतो. या विचारातून अवयवदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवावं आणि लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा चलचित्र देखावा तयार करण्यात आला आहे. हा देखावा साकारण्यापूर्वी विविध हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली. या डॉक्टरांकडून अवयवदान कशाप्रकारे केलं जातं याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर हा देखावा साकारण्यात आला. साधारणतः हा देखावा उभारायला १५ दिवसांचा कालावधी लागला आहे.  – प्रदीप परब; कला दिग्दर्शक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

या देखाव्याच्या माध्यमातून मेंदू मृत झाल्यानंतर रुग्णाचे अवयवदान केल्यास लोकांचे प्राण वाचवणे शक्य होते. तसेच हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड, त्वचा, डोळे, बुब्बळे, हाडे या अवयवांचे दान करता येते, हे दाखवण्यात आलं आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित डॉक्टरांना शिकण्यासाठी मानवी देहाची गरज असते. त्यामुळे, मृत्यूनंतरही समाजाला आपण देणं लागतो, या भावनेतून देहदान करणंही किती गरजेचं आहे हे यातून दर्शवण्यात आलं असल्याचंही परब यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जन्मदात्या मातेचे अवयवदान करण्याचा मुलाचा धाडसी निर्णय


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -