घरमुंबईअपघातांच्या तुलनेत अवयवदानाची संख्या कमी

अपघातांच्या तुलनेत अवयवदानाची संख्या कमी

Subscribe

रस्त्यांवरील अपघातांमुळे मेंदूमृतांची संख्या वाढत आहे. परंतु, अपघातांच्या तुलनेत अवयवदानाची संख्या कमी असल्याची खंत डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.

रस्त्यांवरील अपघातामुळे मेंदूमृतांची संख्या वाढत आहे. परंतु, अद्यापही अवयवदानासंदर्भात गैरसमजूत असल्याने अपघाताच्या तुलनेत अवयवदान होत नसल्याची खंत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे. मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोप समितीच्या १९ व्या वर्धापनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलते होते. सोबतच अवयव प्रत्यारोपणाचा खर्च कमी करण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याची माहितीही डॉ. व्यास यांनी दिली. अवयवदान हेच जीवदान आहे. गरजूंच्या तुलनेत अवयव प्रत्यारोपणाची मागणी पूर्ण होताना दिसत नाही. याबाबतचा विचार केल्यास खासगी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपणाची किंमत फारच जास्त आहे. या किंमती कमी झाल्यास अवयवदान चळवळीचा अधिक चांगला प्रसार होईल, असेही डॉ. व्यास म्हणाले. शीव येथील लोकमान्य टिळक या महापालिका हॉस्पिटलमध्ये शनिवारी मुंबई झेडटीसीसी म्हणजे मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचा १९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

‘गेल्या ५ वर्षात अवयवदानाची सख्या दुप्पटीने वाढली’

अवयवदानाच्या वाढत्या आकडवारीतून प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांना जीवन देता येईल. त्यामुळे अवयवदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये २०१९ च्या पहिल्या तीन महिन्यात अवयवदानाची आकडेवारी दुप्पट आहे. मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. भरत शहा यांनी सांगितलं, “२०१५ साली जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांत १५ जणांनी अवयवदान केलं होत. तर २०१९ साली पहिल्या ३ महिन्यांत तब्बल ३० जणांनी अवयवदान केलं आहे. यावरून गेल्या ५ वर्षात अवयवदानामध्ये दुपटीनं वाढ झाल्याचं दिसतं आहे. ३५ किडनी, २० यकृत, ५ हृदय, दोन फुफ्फुस दान करण्यात आलेत. याशिवाय, कॉर्निया, त्वचा आणि हाडंही दान करण्यात आली.’’ डॉ. शहा पुढे म्हणाले की, ‘‘ १९९७ ते २०१९ या कालावधीत आतापर्यंत मुंबईत ७५० गरजू रुग्णाचं प्रत्यारोपण झालं असून ३,५८५ रुग्ण प्रतीक्षेत आहेत. तर ३१९ यकृत प्रत्यारोपण झालं असून सध्या ४६९ यकृतांच्या प्रतीक्षेत आहे. ११३ गरजूंना हृदय मिळालं असून २९ जणं अद्यापही प्रतीक्षेत आहेत. तर २ फुफ्फुसाचे प्रत्यारोपण झाले असून २३ जणांना अद्यापही फुफ्फुस मिळालेले नाहीत.

- Advertisement -

‘अवयवदान होणं गरजेचं’

आरोग्य संचालनालयाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले की, ‘‘अवयव दानामुळे अनेक वर्षांपासून अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवयवदान होणं गरजेचं आहे. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचं आपणं काही देणं लागतो. या भावनेतून काम केलं पाहिजे.’’ वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे म्हणाले की, ‘‘अवयव प्रत्यारोपण सुरळीत व्हावं, यासाठी सरकारनं झेडटीसीसीची स्थापना केली. पण आता रोटोसोटोसुद्धा काम करतं आहे. मुळात, झेडटीसीसी ही शहरापुरती मर्यादित आहे तर रोटोसोटो हे देशपातळीवर काम करतं. त्यामुळे दोघांनी मिळून काम केल्यास रुग्ण हिता साधता येईल.’’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -