घरनवी मुंबईनवी मुंबईत घर खरेदीला वेग 13 ते 16 मे दरम्यान वाशीत मेगा...

नवी मुंबईत घर खरेदीला वेग 13 ते 16 मे दरम्यान वाशीत मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन

Subscribe

कोरोना संकट निवळत असताना राज्य सरकारने दिलेल्या सवलती आणि प्रोत्साहनपर धोरणांनी नवी मुंबईतही घर खरेदीला वेग आला आहे. हीच संधी हेरून क्रेडाई-बीएएनएम (नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशन) संस्थेने १३ ते १६ मे दरम्यान वाशी येथे २० व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणार्‍या घरापासून अत्याधुनिक लक्झरी फ्लॅट खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती क्रेडाई-बीएएनएमचे अध्यक्ष हरीश छेडा यांनी दिली. कोरोना संकटाच्या काळात मागील 2 वर्षे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले नव्हते. तब्बल दोन वर्षांनंतर वाशी रेल्वे स्थानकासमोर महाराष्ट्र सदनासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.

- Advertisement -

यावेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी, धर्मेंद्र करिया, वसंत भद्रा, रसिक चव्हाण आणि भूपेन शाह, जिगर त्रिवेदी, मनिष शाह आदी बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

=१४० बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
प्रॉपर्टी प्रदर्शनात सुमारे शंभर स्टॉलचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे १४० बांधकाम व्यावसायिकांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे, असेही हरीश छेडा यांनी सांगितले.

- Advertisement -

=महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प; घरांची संधी
नेरळ, खोपोली, कर्जत, रोहिंजण, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उलवे, पामबीच एनआरआय, पाम बीच सानपाडा आदी ठिकाणी आपले महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प निर्माण करत असलेले शेकडो बिल्डर्स मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचे क्रेडाईचे माजी अध्यक्ष भूपेंद्र शाह यांनी सांगितले.

क्रेडाई बीएएनएम प्रदर्शनाचे ३६० हे घोषवाक्य म्हणजे घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना अत्याधुनिक मूलभूत सुविधा (शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सुसज्ज उद्यान, पार्किंग, मार्केट) बांधकाम उद्योजक जवळच उपलब्ध करून देणार आहेत. सामान्य घर खरेदीदार नजरेसमोर ठेवून २० लाखांपासून अत्याधुनिक सुविधा असणारा १० कोटींचा लक्झरीयस फ्लॅट उपलब्ध असणार आहे. घर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार्‍या विविध वित्तीय कंपन्यांचे स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. या प्रदर्शनाद्वारे तिसर्‍या मुंबईचे वैशिष्ठ्य दिसून येणार आहे. परवडणार्‍या घरांचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत.
-मनीष शाह,मिसरी प्रॉपर्टी, चेअरमन, क्रेडाई मॅनेजिंग डायरेक्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -