घरमुंबई#MeToo नाना पाटेकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

#MeToo नाना पाटेकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

Subscribe

अभिनेत्री तनुश्री दत्ताने जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर केलेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर संपूर्ण बॉलिवूडविश्व ढवळून निघाले होते. दोन दिवसापूर्वी तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलीस स्थानकात दहा वर्षापुर्वी झालेल्या त्या घटनेची रितसर तक्रार केली होती. आज ओशिवरा पोलीस स्थानकात तनुश्री दत्ता आणि तिने आरोप केलेल्या लोकांची तब्बल सहा तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी चार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, हॉर्न ओके प्लिज या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माते सामी सिद्दिकी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओशिवरा पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर भांदवि कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप चारही जणांना अटक केलेली नाही.

- Advertisement -

नाना पाटेकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर संपूर्ण बॉलिवूड क्षेत्राबरोबरच क्रीडा, माध्यम, शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा #MeToo चळवळ उभी राहिली आहे. यामध्ये मोठमोठ्या दिगग्ज व्यक्तींवरसुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत. दरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल बोलताना कोणतीच ठोस भूमिका घेत प्रतिक्रिया दिली न्हवती मात्र आता गुन्हा दाखव झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे या #metoo च्या वादळाला नाना पाटेकर यांच्या सोबत हॉर्न ओके प्लिज या सिनेमाची टीम कसे तोंड देते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे बघा –  #MeToo मोहीम भाजपच्या अंगलट, या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -