घरमुंबईऔरंगाबादचे नाव बदलण्यास आमचा विरोध - बाळासाहेब थोरात

औरंगाबादचे नाव बदलण्यास आमचा विरोध – बाळासाहेब थोरात

Subscribe

 औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असताना आता महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेसने याला विरोध केला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाव बदलण्याचा समावेश नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटले की, ‘संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारने सामान्य माणसाचे जीवन सुखी कसे होईल हे पाहायचे, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा मुख्य हेतू आहे. महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये अशाप्रकारे शहरांचे नाव बदलण्याचे ठरलेले नाही.’

- Advertisement -

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, ‘नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही. नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चितच आमचा विरोध राहणार.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -