ब्रिटनमधून मुंबईत आलेल्या १२ कोरोना बाधितांपैकी ६ प्रवासी झाले निगेटिव्ह

मुंबईत आलेल्या १२ प्रवाशांपैकी ६ प्रवाशांचा कोरोना चाचणी अहवाल 'निगेटिव्ह' आला आहे.

मुंबईत गेल्या २५ नोव्हेंबरपासून ते आजपर्यंत इंग्लड, अमेरिका, एखाती देशांमधून विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, यापैकी ६ प्रवाशांचा चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. त्यामुळे या प्रवाशांनी आणि पालिकेनेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यासंदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

मुंबईत २५ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत तब्बल २ हजार ६०० पेक्षा जास्त प्रवासी विदेशामधून मुंबईत आले. तसेच २१ डिसेंबर ते आजपर्यंत आलेल्या सर्व हवाई प्रवाशांची कोरोना चाचणी केली असता त्यामधील बारा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या १२ पैकी पाच जण मुंबईतील असून उर्वरित सात पॉझिटिव्ह हे इतर राज्यांशी संबंधित आहेत. या सर्वांचे कोरोना अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्र (NIB) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आढळून आला आहे. मात्र, तरीही पालिका यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.


हेही वाचा – भाजपचे दोन नगरसेवक शिवसेनेत; गणेश नाईक यांना जोरदार धक्का!