घरमुंबईकोरोनापाठोपाठ साथीचे आजारही आटोक्यात; रुग्णांचे मृत्यू रोखण्यात यश

कोरोनापाठोपाठ साथीचे आजारही आटोक्यात; रुग्णांचे मृत्यू रोखण्यात यश

Subscribe

ऑक्टोबरमध्ये साथीच्या आजारांमध्ये घट झालेली दिसून येत आहे. १० ऑक्टोबरपर्यंत मुंबईमध्ये मलेरियाचे १६९ रुग्ण, डेंग्यू ९७, गॅस्ट्रो ७३, लेप्टो १७ आणि हेपेटायटीसचे १३ रुग्ण सापडले आहेत.

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये थैमान घातलेल्या डेंग्यू आणि मलेरियाची मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे कोरोनापाठोपाठ साथीचे आजारही आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत असला तरी मुंबई महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे साथीचे आजार रोखण्यात यश येत आहे.

पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार डोके वर काढण्यास सुरुवात करतात. त्यानुसार यंदा साथीच्या आजारांनी जुलै, ऑगस्टमध्ये थैमान घातले होते. मात्र अधूनमधून होणार्‍या पावसामुळे सप्टेंबरमध्येही साथीच्या आजारांचा प्रभाव कायम ठेवला होता. यंदा डेेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. मात्र ऑक्टोबरमध्ये साथीच्या आजारांमध्ये घट झालेली दिसून येत आहे. १० ऑक्टोबरपर्यंत मुंबईमध्ये मलेरियाचे १६९ रुग्ण, डेंग्यू ९७, गॅस्ट्रो ७३, लेप्टो १७ आणि हेपेटायटीसचे १३ रुग्ण सापडले आहेत. हे प्रमाण जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या तुलनेत फारच कमी आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण सापडत असले तरी यंदा साथीच्या आजाराने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे साथीच्या आजारांमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण रोखण्यात पालिकेला अखेर यश मिळाले आहे. साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झाले असले तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -