घरताज्या घडामोडीकस्तुरबा, केईएम पाठोपाठ बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग

कस्तुरबा, केईएम पाठोपाठ बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग

Subscribe

कस्तुरबा, केईएम पाठोपाठ बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे.

वुहानमधून आलेल्या करोना व्हायरसने महाराष्ट्रात देखील थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ४२ करोना बाधित आढळून आले असून मुंबईचा आकडा ७ वर गेला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रुग्णालये सज्ज झाली असून करोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांसाठी आता कस्तुरबा, केईएम पाठोपाठ जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा आणि विलगीकरण कक्ष कार्यरत झाले आहेत.

आजपासून बाह्यरुग्ण विभाग सुरु

कस्तुरबामध्ये सुरु केलेल्या बाह्यरुग्ण विभागात दरदिवशी लागणाऱ्या रांगा लक्षात घेऊन ही सेवा विकेंद्रित केली आहे. जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा बुधवार, आजपासून सुरु होणार आहे. या रुग्णालयात २० खाटांटे विलगीकरण कक्षही सुरु केलेला आहे.

- Advertisement -

या विभागात रुग्णांची तपासणी केली जाणार नाही. मात्र, येथील संशयित रुग्णांचे नमुने कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तेव्हा या भागातील प्रवाशांनी बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात
तपासणीसाठी जावे. – डॉ. दक्षा शाह; पालिका उपकार्यकारी आरोग्य अधिकारी

खासगी हॉटेल्समध्येही सुविधा

ज्या प्रवासी रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयांमध्ये जाण्यास हरकत आहे, अशा प्रवाशांसाठी विमानतळावरच चार खासजी हॉटेल्समध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, ही सुविधा मोफत नसणार आहे. रुग्णांना याचा खर्च स्वत:ला द्यावा लागणार आहे. तसेच या रुग्णांची तपासणी सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टर दररोज यांची तपासणी करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – घाबरू नका; राज्यात ८०० रुग्णांच्या टेस्ट पैकी फक्त ४२ करोना पॉझिटिव्ह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -