घरCORONA UPDATEमध्य रेल्वेवर ‘आरोग्य सेतू’ अ‌ॅप सुसाट; २ लाख युजर्सने केले डाउनलोड

मध्य रेल्वेवर ‘आरोग्य सेतू’ अ‌ॅप सुसाट; २ लाख युजर्सने केले डाउनलोड

Subscribe

मध्य रेल्वेच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मिळून तब्बल २ लाख मोबाईल धारकांनी ‘आरोग्य सेतू’ हे अ‌ॅप डाऊनलोड केले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

कोरोना हे जागतिक संकट देशासमोर उभे आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी आणि कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अ‌ॅप लाँच करण्यात आले आहे. या माध्यमातून युद्धस्तराव सर्व शासकीय संस्थामार्फत जनजागृती सुरु आहे. मात्र यात कमी कालावधीत मध्य रेल्वेने बाजी मारली आहे. मध्य रेल्वेच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मिळून तब्बल २ लाख मोबाईल धारकांनी ‘आरोग्य सेतू’ हे अ‌ॅप डाऊनलोड केले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दैनिक आपलं महानगरला दिली.

भारतीय रेल्वेने कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना आरोग्य सेतू हे विशेष मोबाईल अॅप्लिकेशन इंस्टॉल करण्याचे आवाहन केले आहे. तसेच युद्धपातळीवर मध्य रेल्वेनी आपल्या कर्मचाऱ्यांना याविषयी जनजागृती करून या ‘आरोग्य सेतू’ बद्दलची माहिती दिली. हे अ‌ॅप कसे काम करते, याचा फायदा काय याची संपूर्ण माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत मध्य रेल्वेच्या १ लाख कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळून सरासरी २ लाख मोबाईलमध्ये हे आरोग्य सेतू अ‌ॅप इंस्टॉल करण्यात यश आले आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या पाच झोनमध्ये मिळून १ लाख ३३६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील प्रत्येकाला विभागामार्फत फोन करून अ‌ॅप संबंधित माहिती देण्यात आली. तसेच हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची विनंती केली होती. त्याला रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. कालपर्यंत तब्बल १ लाख ९७ हजार ६०४ जणांनी हे आरोग्य सेतू अ‌ॅप इंस्टॉल केले आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धस्तरावर शासनासोबत भारतीय रेल्वे प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘आरोग्य सेतू’मोबाईल अॅप डाऊनलोड करून कोरोनाशी सुरू असलेल्या या युद्धात एकजुटीने सहभागी होऊन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लढा द्यावा. असे आव्हान करण्यात आले होते. त्याला आता यश येत आहे.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

कसे करते काम ?

‘आरोग्य सेतू’ अॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह ११ भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे. याबाबत आकलन होते. ‘आरोग्य सेतू’ ॲप कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचे काम करेल. तसेच हे ॲप युझर्सच्या ब्लूटूथ, मोबाईल नंबर आणि लोकेशनवरून तो व्यक्ती कोरोनाबाधितांच्या संपर्कात आला तर नाही ना? या गोष्टी ट्रेस करेल. तसेच हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

- Advertisement -

विभाग             कर्मचारी                डाऊनलोड

मुंबई             ४९,२०२                १,०५,४२४
पुणे                ९,२१०                   २०,०२८
भुसावळ         १६,०२६                  २४,००७
नागपूर           १५,७५०                  २६,३५८
सोलापूर          १०,१४८                  २०,७८७

एकूण –        १,००,३३६                १,९६,६०४

हेही वाचा –

Coronavirus: तबलीगी जमातच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची अकोल्यात आत्महत्या

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -