घरक्राइममुंबई विमानतळावर 1.40 कोटी किंमतीचे 3 किलो सोने जप्त; तीन विदेशी नागरिकांना अटक

मुंबई विमानतळावर 1.40 कोटी किंमतीचे 3 किलो सोने जप्त; तीन विदेशी नागरिकांना अटक

Subscribe

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून तीन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या नागरिकांकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तब्बल 3 किलो सोने जप्त केले आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून तीन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या नागरिकांकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तब्बल 3 किलो सोने जप्त केले आहे. ज्याची बाजारभावातील किंमत प्राथमिक चौकशीनुसार तब्बल 1.40 कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. (Over 3 Kg Gold Worth Rs 1 40 Cr Hidden Inside Shoes Seized in Mumbai)

अटक करण्यात आलेल्या तीनही नागरिकांनी हे सोने आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये (Undergarments) लपवले होते. अंतर्वस्त्रात लपवलेले सोने विमानतळाबाहेर नेण्याच्या प्रयत्नात असतानाच तिघांनाही अटक करण्यात आली. याबाबत सीमाशुल्कच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

- Advertisement -

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा एक व्हिडिओही वृत्तसंस्था एएनआयने ट्विट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 विदेशी नागरिकांच्या अटकेची कारवाई 10 मार्च रोजी करण्यात आली. हे तिनही नागरिक दिस अबाबाहून मुंबई विमानतळावर आले.

दरम्यान, या तिघांना गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. या नागरिकांनी आपल्या अंतर्रवस्त्रांमधून आणि पादत्रानांमधून सोने लपवल्याचे आढळून आले.

- Advertisement -

सीमाशुल्कच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सीमाशुल्क कायद्याच्या कलम 110 अंतर्गत सोने जप्त करण्यात आले आणि प्रवाशांना कायद्याच्या कलम 104 अंतर्गत अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा – समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास केंद्राचा स्पष्ट नकार, निसर्गविरोधी संबंधांना…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -