घरताज्या घडामोडीबेफिकीर मुंबईकरांचा विनामास्क लोकल प्रवास; पहिल्याच दिवशी ५०० प्रवाशांवर कारवाई

बेफिकीर मुंबईकरांचा विनामास्क लोकल प्रवास; पहिल्याच दिवशी ५०० प्रवाशांवर कारवाई

Subscribe

विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून लोकलचे दरवाजे बंद करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्ती वगळता सर्वसामान्य व्यक्तींना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. परंतु, पहिल्याच दिवशी लोकल प्रवासाठी निघालेल्या प्रवाशांनी विनामास्क प्रवास केल्याचे आढळून आले. अशा तब्बल ५००हून अधिक प्रवाशांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

रेल्वे प्रशासनासह पालिकेची कारवाई

विनामास्क प्रवास करणाऱ्या २७५ प्रवाशांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे. विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २०० रुपयांची दंड वसूली करण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वे प्रशासनाने २३७ प्रवाशांवर धडक कारवाई केली आहे.

- Advertisement -

कधी प्रवास करता येणार नाही

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेतून प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. तर सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.


हेही वाचा – १५ फेब्रुवारीपासून राज्यात महाविद्यालयं सुरू! शिक्षणमंत्र्यांची घोषणा

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -