Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट, ८४ कोटींचे कंत्राट मंजूर

पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट, ८४ कोटींचे कंत्राट मंजूर

केईएम, सायन, नायर आदी प्रमुख रुग्णालयांसह ९ रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती करणारे १६ प्लांट बसविणार

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी (Covid Positive Patients) जीवनावश्यक ठरणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई महापालिका केईएम, सायन, नायर आदी प्रमुख रुग्णालयांसह ९ रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती करणारे १६ प्लांट बसविणार आहे. त्यासाठी मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट काम देण्यात आले असून त्यासाठी पालिका कंत्राटदाराला ८४ कोटी रुपये मोजणार आहे. (Oxygen plant in BMC hospital, contract worth Rs 84 crore sanctioned)  यासंदर्भातील प्रस्तवाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामांसाठी मुंबई महापालिका विरार, वसई महापालिकेच्या तुलनेत जास्त, दुप्पट खर्च करीत असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचा आरोप भाजपचे पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी ११ मे रोजी केला होता. तसेच, सदर कामाच्या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. तर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी, रुग्णांसाठी ऑक्सिजन प्लांट आवश्यक आहे, मात्र यात जे काही काळेबेरे वाटत आहे त्याची पालिकेने चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

दरम्यान, सदर प्रस्ताव बुधवारी पार पडलेल्या बैठकीत बिनविरोध मंजूर करण्यात आला. त्यावेळीही विनोद मिश्रा यांनी काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कूपर, कुर्ला भाभा , व्ही. एन. देसाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि जीटीबी रुग्णालय आदी ९ रुग्णालयात २२,७९ लिटर प्रति मि. एवढ्या क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत.

- Advertisement -

वास्तविक, या कंत्राट कामासाठी तीन कंत्राटदारांनी टेंडर भरले होते ; मात्र दोन कंत्राटदार हे तांत्रिक निकषावर अपात्र ठरल्याने मेसर्स. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला हे कंत्राट एका वर्षासाठी देण्यात आले आहे. कंत्राटदाराने या कामासाठी ९२.८५ कोटी रुपये इतकी रक्कम प्लांट उभारणी व देखभाल, दुरुस्तीसाठी मागितली होती. मात्र पालिकेने त्याच्याशी वाटाघाटी केल्याने अखेर कंत्राटदाराला पालिका ८३.८३ कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत. त्या कंत्राटदाराने ऑक्सिजन प्लांट उभारून त्याची ५ वर्षे देखभाल, दुरुस्ती करावयाची आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत रुग्णवाढीचा दर ०.११ टक्क्यांवर, ६५८ रुग्णांची कोरोनावर मात

- Advertisement -