घरदेश-विदेशपाकिस्तानी मुल्लाने भारताविरोधात ओकली गरळ, गझनीचे कौतुक करताना म्हणाला...

पाकिस्तानी मुल्लाने भारताविरोधात ओकली गरळ, गझनीचे कौतुक करताना म्हणाला…

Subscribe

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडला असला तरी पाकिस्तानकडून (Pakistan) भारत (India) आणि हिंदूंच्या (Hindu) विरोधात गरळ ओकणे सुरूच आहे. पाकिस्तानच्या मुल्ला खादिम रिझवीने (Mullah Khadim Rizvi) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य करतानाच गझनीने सोमनाथ मंदिरात (Somnath temple) केलेल्या तोडफोडीचे समर्थन केले. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – अतिकचे हत्याकांड घडवून मलिक यांचा स्फोट दडपण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांची टीका

- Advertisement -

पाकिस्तानी मुल्ला खादिम रिझवी एका कार्यक्रमात अनुयायांसमोर भाषण देताना या व्हिडीओत दिसत आहे. या भाषणात त्याने महमूद गझनीने भारतातील सोमनाथ मंदिराच्या (Somnath temple) केलेल्या तोडफोडीचा उल्लेख केला. तसेच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा जनरल आम्हाला धमक्या देत आहे, पण गझनीची मुले येत आहेत हे त्यांना कळायला हवे, अशी मग्रुरीची भाषा त्याने केली आहे.

महमूद गझनवीवर हिंदूंचा अजूनही राग
तुम्ही अशी हिंदूविरोधी विधाने का करता? तुम्हाला हिंदूंकडून काय हवे आहे? असे हिंदू मला वारंवार विचारतात. तेव्हा मी सांगतो की, मला महमूद गझनीला पुन्हा बोलवायचे आहे, असे पाकिस्तानी मुल्ला खादिम रिझवी याने म्हटले आहे. 1000 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु महमूद गझनीवर हिंदूंचा अजूनही राग आहे, असेही तो म्हणाला.

- Advertisement -

महमूद गझनीने हिंदूंना खूप वेदना दिल्या आहेत, त्यांचा राग आहे, असे सांगून मुल्ला म्हणाला की, गझनी जेव्हा देवीदेवतांच्या मूर्ती फोडत होता, तेव्हा हिंदू त्याच्याकडे गेले आणि तुम्हाला सोने आणि पैसे, जे पाहिजे ते घ्या, फक्त या मूर्ती तोडू नका, अशी विनवणी हिंदूंनी केली. यावर गझनी म्हणाला की, ”उपरवाले ने’ आम्हाला मूर्ती तोडायला शिकवले आहे. तुमचा देव आता जाणार. या सगळ्या गोष्टी आम्हाला समजत नाहीत, कारण मी जे शिक्षण घेतले आहे, त्यात आम्हाला फक्त मूर्ती फोडायला शिकवले आहे,’ असे गझनी म्हणाल्याचे मुल्ला खादिम रिझवीने म्हटले आहे. तथापि, हा व्हिडीओ कधीचा आहे आणि त्याच्या सतत्येबाबत ‘माय महानगर’ पुष्टी करत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -