Eco friendly bappa Competition
घर नवी मुंबई चुकीच्या चाचण्या, कोविड रिपोर्टमुळे पनवेलच्या नागरीकांमध्ये घबराट

चुकीच्या चाचण्या, कोविड रिपोर्टमुळे पनवेलच्या नागरीकांमध्ये घबराट

Subscribe

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा आरोप

कोरोनाच्या संकटात पनवेलमध्ये चुकीच्या चाचण्या आणि वादग्रस्त कोविड रिपोर्टमुळे पनवेलकर नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचा आरोप पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केला आहे. डिसेंबर महिन्यात केलेल्या रुग्णांच्या टेस्ट आणि या महिन्यात केलेल्या रुग्णांच्या टेस्ट यामध्ये संख्येत वाढ आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा फुगतो आणि नागरिक भयभीत होत असल्याचे प्रितम म्हात्रे म्हणाले.

वाढत्या टेस्ट केल्यामुळे रुग्ण साहजिकच जास्त येणार. तसेच एका सोसायटीमध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली म्हणून सरसकट सगळ्या घरांमध्ये टेस्ट करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. अशावेळी घरातील सुदृढ व्यक्तीला सुद्धा पॉझिटिव्ह ठरवण्यात येते. त्यामुळे घरातील तसेच त्या इमारतीतील सर्व वातावरण घबराटीचे होते. सदर रिपोर्ट करत असताना बिल्डींगमधील व्यक्तीचे नाव, त्याच्या राहत असणार्‍या मजल्याचा क्रमांक, तसेच त्याचा राहत असलेला इमारतीमधील रूमचा क्रमांक यामध्ये तफावत आढळून आली असल्याचा दावा प्रितम म्हात्रे यांनी केला आहे. असा गोंधळ निर्माण करणारा रिपोर्ट जेव्हा नागरिकांना समजतो तेव्हा नागरिकांमध्ये घबराट पसरते. मात्र हा सारा प्रकार वाढीव चाचण्यांमुळे होत असल्याचे प्रितम म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अनेकांनी प्रितम म्हात्रे यांच्याकडे तक्रारी केल्यावर त्यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना अवगत केले वा पनवेलकर घाबरणार नाहीत, अशी दक्षता घेण्याची विनंती केली. तसेच टेस्ट करत असलेल्या संस्थेला सुद्धा यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस जारी करण्याची मागणी त्यांनी केली. पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात विरोधी पक्ष नेत्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवर विश्वास आहे परंतु अशा घटना घडत असतील तर गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रश्न कोविड कायद्याशी संबंधित असल्याने घाबरून कोणी बोलण्यास पुढे येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -