घरनवी मुंबईपनवेल-गोरेगाव लोकल १ डिसेंबरपासून धावणार

पनवेल-गोरेगाव लोकल १ डिसेंबरपासून धावणार

Subscribe

बहुप्रतिक्षित पनवेल-गोरेगाव लोकल अखेर पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे. बुधवार, १ डिसेंबर २०२१ पासून पनवेल-अंधेरी लोकल गोरेगावपर्यंत धावणार असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रवासी प्रतिनिधी म्हणून भक्तीकुमार दवे यांच्या हस्ते ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळते.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल-अंधेरी ही लोकल सेवा २ ऑक्टोबर २००७ या वर्षापासून सुरू झाली. प्रवासी संघातर्फे पहिल्या फेरीला हिरवा बावटा दाखविण्यात आला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यात गोरेगावपर्यंत आणि दुसर्‍या टप्प्यात ही रेल्वे बोरीवलीपर्यंत विस्तारीत करण्याचे रेल्वे प्रशासनानेे २०१४ पर्यंतचे उद्दिष्ट ठेवले होते. यासाठी एमआरव्हीसी प्रशासनांचे युद्ध पातळीवर काम चालू होते. तथापि अभियांत्रिकी काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडला. मात्र प्रवासी संघाच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर अखेर हा मार्ग विस्तार सुरू होत आहे. पनवेल-अंधेरी लोकलच्या सद्यस्थितीत ९ अप व ९ डाऊन अशा एकूण १८ फेर्‍या धावत आहेत. प्रवासी संघ व रेल्वे स्थानक स्थानीय सल्लागार समिती सदस्य, उपनगरीय सल्लागार समिती सदस्य, झेड आरयूसीसी व एनआरयूसीसी सदस्य या सर्वांतर्फे पनवेल-गोरेगावपर्यंत धावणार्‍या फेर्‍यांमध्ये सकाळ-संध्याकाळच्या काळात वाढ करावी, असे लेखी निवेदन देण्यात आले होते.

- Advertisement -

या मार्गातील विस्तारासाठी वेळापत्रक ठरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता बुधवार १ डिसेंबर या दिवशी विस्तार सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर काम चालू आहे. १ डिसेंबर २०२१ म्हणजेच बुधवारपासून पनवेल-अंधेरी लोकल रेल्वे सेवेचे विस्तारीकरण गोरेगावपर्यंत करण्याचे त्याचप्रमाणे पनवेल-गोरेगाव रेल सेवेचे सुधारित वेळापत्रक त्याच दिवशी प्रवासी बांधवांना वितरीत करण्याचा रेल्वे प्रशासन व प्रवासी संघातर्फे प्रयत्न चालू आहे. या विस्तारामुळे गाडी बदलण्याची प्रवाशांना करावी लागणारी कसरत टळेल, असे सांगितले जाते. प्रवासी संघाचे अध्यक्ष व पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. भक्तिकुमार दवे व झेडआरयूसीसी सदस्य अभिजीत पाटील यांच्या हस्ते पनवेल रेल्वे स्थानकावरून पहिल्या रेल्वे लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

१ डिसेंबर २०२१ म्हणजेच बुधवारपासून पनवेल-अंधेरी लोकल रेल्वे सेवेचे विस्तारीकरण गोरेगावपर्यंत करण्याचे त्याचप्रमाणे पनवेल-गोरेगाव रेल सेवेचे सुधारित वेळापत्रक त्याच दिवशी प्रवासी बांधवांना वितरीत करण्याचे रेल्वे प्रशासन व प्रवासी संघातर्फे प्रयत्न सुरू आहेत. मार्ग विस्ताराचा फायदा प्रवाशांना होईल.
– श्रीकांत बापट, उपनगरीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -