घरताज्या घडामोडीदेशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना CBI समन्स, गेल्या ३ तासांपासून चौकशी सुरुच

देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना CBI समन्स, गेल्या ३ तासांपासून चौकशी सुरुच

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे गृहमंत्रीपदाची खुर्ची सोडवावी लागलेले अनिल देशमुख यांच्या अडचणीत आखणीन वाढ झाली आहे. सीबीआय (CBI)ने आता अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स बजावला असून चौकशी सुरू आहे. यानंतर खुद्द अनिल देशमुख यांना सीबीआय चौकशी सामोर जावे लागणार आहे. माहितीनुसार, दुपारी १२ वाजल्यापासून देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांची चौकशी सुरू आहे.

अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि एस. कुंदन यांची सध्या मुंबईच्या डीओरडीओच्या गेस्ट हाउसमध्ये चौकशी केली जात असून जबाब नोंदणी सुरू आहे. गेल्या तीन तासांपासून या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. माहितीनुसार, हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय असून १०० कोटींच्या वसूलीमध्ये त्यांचा देखील हात असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

सध्या परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपा प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या आरोपाप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. पण त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळली आणि याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे आता अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशी केली जाणार आहे.


हेही वाचा – राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, मिळाला डिस्चार्ज

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -