घरताज्या घडामोडीParambir Singh : परमबीर सिंहांची क्राईम ब्रॅंचकडून ६ तास चौकशी सुरू, २३१...

Parambir Singh : परमबीर सिंहांची क्राईम ब्रॅंचकडून ६ तास चौकशी सुरू, २३१ दिवसांनी हजेरी

Subscribe

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे अखेर २३१ दिवसांनी मुंबईत हजर झाले. परमबीर सिंह यांची गेल्या ४ तासांपासून मुंबई क्राईम ब्रॅंचकडून चौकशी सुरू आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंह यांचा मोबाईल बुधवारी सुरू झाल्याचा आणि ते सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असल्याचा दावा काही प्रसिद्धी माध्यमांनी केला होता. परमबीर सिंह हे चंदीगढ येथे असल्याचा दावा केला जात होता. अखेर परमबीर सिंह हे एकाएकी मुंबई दाखल झाल्याची वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. परमबीर सिंह यांनी मुंबईत दाखल झाल्यावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले परमबीर सिंह ?

मी तपासाला सहकार्य करण्यासाठीच मुंबईत दाखल झालो आहे. माझ म्हणण मी कोर्टात मांडणार आहे. न्यायालयात मला नक्कीच न्याय मिळेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारीनंतर तपास यंत्रणांनी खंडणी प्रकरणात त्यांच्याविरोधात समन्स जारी केला होता. सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंह यांना दिलासा देणाऱ्या सूचना आल्यानंतर परमबीर सिंह मुंबईत हजर झाले. परमबीर सिंह यांच्या अटकेपासून दिलासा मागण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेत सीबीआय आणि महाराष्ट्र सरकारला आदेश दिले होते. त्याआधी परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा सांगा, तोवर सुनावणी घेणार नाही असा पवित्रा सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांच्या वकिलांकडून ते देशातच आहेत, ४८ तासात न्यायालयासमोर हजर होतील असे सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळाल्यानंतरच परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत.

- Advertisement -

परमबीर सिंह विषयावर मंत्रीमंडळ बैठकीनंतर खलबत

परमबीर सिंह प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतरच ही स्वतंत्र बैठक सुरू असल्याचे कळते. मुंबईत दाखल झालेल्या परमबीर सिंह यांच्या निमित्तानेच ही बैठक सुरू असल्याचे कळते. दरम्यान मुंबईत तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची भाषा परमबीर सिंह यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच कोर्टामध्येही परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांविरोधात आणखी पुरावे नसल्याची बाजू मांडली होती. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याविरोधात नेमकी काय भूमिका राज्य सरकार घेणार हा प्रश्न आहे.

परमबीर सिंह यांच्यावर काय आरोप आहेत?

गोरेगाव येथील हॉटेल बोहो अ‍ॅण्ड रेस्टॉरंट हे विनादिक्कत सुरू रहावे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करू नये, म्हणून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची खंडणी उखळली, अशी तक्रार हॉटेल मालक बिमल अग्रवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, खासगी इसम अल्पेश पटेल, रियाज भाटी, विनय सिंह उर्फ बबलू, सुमित सिंह उर्फ चिंटूसह ६ जणांविरुद्ध खंडणी, धमकी देणे, कट रचणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडे तपासासाठी सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात किल्ला न्यायालयाने परमबीर सिंग , रियाज भाटी आणि विनय सिंह यांना फरार घोषित केले होते, तसेच ३० दिवसात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मुंबई, ठाणे, अकोला, नाशिकसह राज्यभरातील एक डझनहून अधिक पोलिस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी, अपहरण, ब्लॅकमेकिंग, अॅट्रोसिटी, सट्टेबाजी या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

कसाबचा मोबाईल परमबीर सिंहांकडे, दहशतवाद्यांना मदत केल्याचा समशेर खान पठाण यांचा आरोप

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -