घरमुंबईमुंबईकरांना राज्य शासनाकडून पार्किंगचे गिफ्ट; असा दिला दिलासा...

मुंबईकरांना राज्य शासनाकडून पार्किंगचे गिफ्ट; असा दिला दिलासा…

Subscribe

मुंबईः मुंबईमध्ये पार्किंगची अवस्था दयनीय आहे. यावर तोडगा म्हणून राज्य शासनाने मुंबईतील पार्किंगची उंची १५ मीटरवरून २४ मीटर केली आहे. त्यामुळे अधिकाधिक गाड्यांची पार्किंग आता एका ठिकाणी होऊ शकते. मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

मुंबईतील पार्किंग समस्येवर तोडगा काढणारे विधेयक मंत्री सामंत यांनी गुरुवारी विधानसभेत मांडले. मुंबईत पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पार्किंगची उंची १५ मीटरवरुन २४ मीटर करणारे विधेयक सभागृहासमोर मांडले जात आहे. त्यास मंजूरी द्यावी, अशी विनंती मंत्री उदय सामंत यांनी केली. सभागृहात हे विधेयक मंजूर झाले. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

यावेळी अग्निसुरक्षेचे विधेयकही मंत्री सामंत यांनी सादर केले. वाढत्या आगीच्या घटना रोखण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट व फायर ऑडिट सक्तीचे करण्याची तरतूद आहे. या विधेयकास मंजुरी द्यावी, अशी विनंती मंत्री सामंत यांनी केली. सभागृहात हेही विधेयक मंजूर झाले.

मुंबईमध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन इमारतींमध्ये पार्किंग व्यवस्था असायलाच हवी अशी सक्ती प्रशासनाने केली आहे. महापालिकेनेही पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिली आहे. या पार्किंगमध्ये इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करण्याचीही सुविधा आहे. तरीही रस्त्याच्याकडेला, काही ठिकाणी तर पदपथावर वाहने उभी केली जातात. याचा त्रास पादचाऱ्यांना होतो. महापालिका व राज्य शासन या समस्येवर काही ना काही तोडगा काढत असते. आता शिंदे-फडणवीस सरकारने पार्किंगची उंची वाढवली आहे. १५ मीटर उंचीत किमान तीन वाहनांची पार्किंग शक्य होते. आता ही उंची २४ मीटर केल्याने तेथे किमान पाच किंवा सहा वाहनांची पार्किंग होऊ शकते. वाहनाच्या उंचीनुसार तेथे पार्किंग होऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे पार्किंगची व्यवस्था असेल तरच तुम्ही वाहन खरेदी करु शकता, असा नियम आहे. आता पार्किंगची व्यवस्था वाढवल्याने मुंबईकरांना वाहन घेतानाही अडचण येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -