घरमहाराष्ट्रसंसद भवन हे देशासाठी आणि लोकशाही मधलं आमचं मंदिर; सुप्रिया सुळे यांची...

संसद भवन हे देशासाठी आणि लोकशाही मधलं आमचं मंदिर; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Subscribe

पुणे : संसद भवन हे देशासाठी आणि लोकशाही मधलं आमचं मंदिर आहे. एकत्रपणे आम्ही सर्व तो साजरा करण्यासाठी देशासाठी एकत्र आलो असतो तर ते जास्त संयोगिक ठरलं असतं, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. (Supriya Sule responded that Parliament House is our country and the temple of democracy)

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संसद चालवायची आणि संसदेची सर्व जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असते. संसदेची परंपरा आहे की, संसद कोषागार खंडपीठ चालवतो. त्याच्यामुळे जर कोषागार खंडपीठाने इतर वेळी जेव्हा बिल पास करायची असतात तेव्हा सर्व मोठे नेते, मंत्री हे या देशातल्या मोठ्या मंत्र्यांना, नेत्यांना फोन करतात. म्हणजे ऐरव्ही तुमचं काम असले तेव्हा मंत्री नेत्यांना फोन करून सांगतात की, जीएसटीचं बिल पास करायचं आहे एका मंताने पास करूया. तसं या सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी जर या देशातल्या सर्व विरोधी पक्षाला एखादा फोन केला असता तर सर्व आनंदाने गेले असते. खरं तर आपण जेव्हा म्हणतो की, संविधानाने देश चालतो आणि ही जर लोकशाही असेल तर लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी आग्रह होता विरोधी पक्ष असलाच पाहिजे आणि हे आपल्या संविधानात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.

- Advertisement -

माझ्यासाठी जुनी वास्तू लोकशाहीचं मंदिर
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी नवीन वास्तू पाहिली नाही, पण माझं वैयक्तित मत आहे, मला जुनी वास्तू ही अतिशय प्रिय आहे. त्याच्या भिंतीही बोलक्या आहेत. देशातले इतके मोठे नेते त्या वास्तूमध्ये ते बसलेले आहे. देशातली धोरणे त्या वास्तूमध्ये घेतलेली आहेत. त्यामुळे माझ्यासाठी एक लोकशाहीचं मंदिर असेल तर ती जुनी वास्तू असेल.

हा कार्यक्रम व्यक्तीचा आहे का संसदेचा?
लोकसभेचा अध्यक्ष हे स्पिकर्स जे ओम बिर्ला आहेत. पण राज्यसभा आहे की नाही संसदेमध्ये. राज्यसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांना तुम्ही बोलावले नाही. म्हणजे तुम्ही पूर्णपणे राज्यसभेला हद्दपारचं केलं आहे. याचा अर्थ राज्यसभा संसदेमध्ये नाही आहे का? ओम बिर्ला यांना बोलावले याचा आनंद आहे. पण त्याचबरोबर राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्षांना बोलवायला हवे होते. त्याच्यामुळे हा कार्यक्रम व्यक्तीचा आहे का संसदेचा? हा एक मनात प्रश्न उभा राहतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे की, संसदेचा कार्यक्रम करू नका कारण ते आमच्यासाठी लोकशाहीचं मंदिर आहे. त्यामुळे देशाच्या वतीने तुमच्या सगळ्याच्या वतीने आम्ही तिथे जातो. आमची वैयक्तिक ओळख नाही आहे, आमची ओळख तुमच्यामुळे होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -