Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमMurder : सीटच्या वादातून प्रवाशाची अल्पवयीन मुलाकडून हत्या; आरोपी मुलासह भावाला अटक

Murder : सीटच्या वादातून प्रवाशाची अल्पवयीन मुलाकडून हत्या; आरोपी मुलासह भावाला अटक

Subscribe

सीटच्या वादातून अंकुश भालेराव या 37 वर्षांच्या प्रवाशाची एका अल्पवयीन मुलाने चाकूने वार करत हत्या केली. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलासह त्याचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्लाह सोहेल बेठा याला अटक केली.

मुंबई : सीटच्या वादातून अंकुश भालेराव या 37 वर्षांच्या प्रवाशाची एका अल्पवयीन मुलाने चाकूने वार करत हत्या केली. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलासह त्याचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्लाह सोहेल बेठा याला अटक केली. (passenger killed by minor due to seat dispute; accused son and brother arrested in murder case)

या प्रकरणी अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर मोहम्मद सनाउल्लाहला कुर्ला येथील स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हत्येची माहिती असतानाही आपल्या भावाला मदत करण्याचा तसेच हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Cyber Crime : सायबर ठगांना बँक खाती पुरविणारा गजाआड; दोन महिन्यांत उघडली 35 बँक खाती

अंकुश हा टिटवाळा येथे राहत असून घाटकोपरच्या एका वाईन शॉपमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहे. 14 नोव्हेंबरला तो टिटवाळा येथून घाटकोपरला जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होता. यावेळी त्याचा सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाशी वाद झाला. त्यातून त्याने त्याच्या कानशिलात लगावली होती. त्याचा या मुलाच्या मनात राग होता. दुसर्‍या दिवशी त्याने घाटकोपर रेल्वे स्थानकात अंकुशवर चाकूने हल्ला केला. यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्यामुळे त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद सनाउल्लाहला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्या भावाने हा हल्ला केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर चाकू हल्ला करणार्‍या सोळा वर्षांच्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरी सुधारगृहात पाठविण्यात आले, तर मोहम्मद सनाउल्लाहने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला मदत केल्याने या गुन्ह्यांत सहआरोपी दाखविण्यात आले आहे. (passenger killed by minor due to seat dispute; accused son and brother arrested in murder case)

हेही वाचा – Mumbai Crime : टॉवेलने गळा आवळून पत्नीचा खून; मलबार हिल पोलिसांनी केली पतीला अटक


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -